मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : कुंभ राशीच्या लोकांनी कामकाजात गुप्तता बाळगा! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar kumbh meen rashi today : कुंभ राशीच्या लोकांनी कामकाजात गुप्तता बाळगा! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 18, 2024 05:33 PM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 18 february 2024 : आज १८ फेब्रुवारी २०२४ रोजी, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल रविवारचा दिवस ? वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

makar kumbh meen
makar kumbh meen

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र बुधाशी योग करीत असुन सरस्वती योग निर्माण होत आहे. तैतील करणात आणि सरस्वती योगात मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल! वाचा राशीभविष्य!

मकरः 

आजच्या चंद्र गोचरात कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

कुंभः 

आज बुध-चंद्र योगात खरेदी आणि शुभ कामा साठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. लोकप्रियता समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. या क्षेत्रा मध्येही मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्या मुळे विवेक ठेऊन वेळीच सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०४, ०८.

मीनः 

आज घटीत होणारा सरस्वती योग पाहता धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेश गमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्म विश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील. व्यापारात साथिदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.