Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र मीन राशीत गोचर करीत असून, शुक्राशी नवमपंचम योग करत आहे. मकर, कुंभ व मीन राशीसाठी दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!
आज चंद्र शुक्राशी योग करत आहे. थोडा तापट स्वभाव सगळ्यावर पाणी पाडू शकतो. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा. अती संवेदन शील स्वभावामुळे प्रत्येक गोष्टीचा उगाचच विचार करीत रहाल. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना काळ अनुकूलच आहे. कर्ज फेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.
आज बुधाच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमण विशेष लाभदायक ठरणार आहे. तुमच्यासमोर शत्रूंचे काही चालणार नाही. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. इतरांना सल्ले देण्यात आणि इतरांच्या वर्तनात कशी सुधारणा हवी हे समजवण्यात पुढे रहाल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. अध्यात्मिक उन्नती साधाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहिल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.
शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०१, ०८.
आज राहु-चंद्र युतीयोगात तुमची वृत्ती आनंदी असली तरी कोणी तुमच्याशी स्पर्धा करीत आहे असे जाणवल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमचे कोणतेही काम एका हेलपाट्यात होणार नाही. त्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. मोठ्यांच्या मना प्रमाणे वागावे लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणात्मक राहिल. उद्योग धंदयात लक्ष कमी होईल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्ते बाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्य पणाची भुमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका.
शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.