Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज चंद्र वृषभ राशीत भ्रमण करत असून, राजयोग आणि लक्ष्मीयोगात मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल! वाचा राशीभविष्य!
आज अशुभ चंद्रभ्रमणात प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागू शकतो. स्पष्ट बोलाल त्यामुळे काहींना ते आवडणार नाही. नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत. जोडीदारा बरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. आपल्या व वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात. नोकरीत केलेली चुकू महागात पडेल. कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. शासकीय सेवेत प्रलोभनांना बळी पडू नये. कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा. व्यापारात कर्जप्रकरणे नामंजूर होतील. कर्ज घेणे देणे टाळावे. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. हानीकारण दिनमान आहे. लेखी कागदपत्राशिवाय मोठे व्यवहार टाळावेत. शक्यतो प्रवास टाळावेत. वाहने सावकाश चालवा. अपघात भय संभवते. शारिरिक व्याधी कडे दुर्लक्ष करू नये.
शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.
आज चंद्र प्लुटो-चंद्र संयोगात आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. नातेवाईकां कडून सहकार्य लागेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. महत्वाची कामे तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या वेळेस पुर्ण होतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०५, ०९.
आज प्रतिकूल चंद्रभ्रमणात आपणास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. थोडे आस्थिर आणि चंचलं बनाल. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. गुप्तशत्रुपासुन पिडा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा. अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे. नेहमीच्या कामात खुप मेहनत घ्यावी.
शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.
संबंधित बातम्या