मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : मीन राशीसाठी वातावरण उत्साहवर्धक राहील! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Makar kumbh meen rashi today : मीन राशीसाठी वातावरण उत्साहवर्धक राहील! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 16, 2024 09:39 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 16 january 2024 : मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल संक्रांती करिदिनाचा दिवस ? वाचा आजचे राशीभविष्य!

Capricon, Aquarius, Pisces
Capricon, Aquarius, Pisces

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र शनिच्या नक्षत्रातुन संक्रमण करणार असून, केतुशी प्रतियोग करणार आहेत. परिघ योग आणि कौलव व तैतील करणात मकर, कुंभ व मीन राशीसाठी दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

मकरः 

आज चंद्राचं राशीस्वामी शनिच्या नक्षत्रातील भ्रमणात राजकारणात असलेल्या व्यक्तींना समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोचावे लागेल. घरात सर्वांनी शिस्त पाळावी असं वाटेल परंतु त्याची सुरुवात प्रथम तुमच्या पासून करा. नोकरीमध्ये कोणावरही अवलंबून राहू नये. स्वत:ची कामे स्वतः करावीत. प्रेमप्रकरणात घरच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल. रोजगारात विपरित प्रसंग घडतील. आर्थिक टंचाई निर्माण होतील. मनात नैराश्य निर्माण होईल. अविचारी निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. विचार पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. खर्चामध्ये वाढ होईल. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या. वाहन सावकाश सांभाळुन चालवा. अपघात भय संभवते. कुटुंबातील खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०४, ०८.

कुंभः 

आज चंद्र भ्रमणात तुमच्या हजरजबाबी स्वभावा मुळे लोकांवर प्रभाव पाडाल. राजकारणी लोक आपला मुत्सद्दीपणा दाखवतील. भक्तिमार्गाकडे वळाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. नोकरी व्यवसायात तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. एखादे काम धाडसाने करण्यात तुमचा पुढाकार असेल. इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्र आणि शुभचिंतक याच्या माध्यमातून आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहिल. नोकरीत प्रगती होण्याचे संकेत मिळतील. मोठ्या तसेच प्रतिष्ठित लोकांशी संबंध वाढतील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल. विचारपूर्वक कामे केली तर आजचा दिवस चांगला जाईल.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०१, ०७.

मीनः 

आज चंद्रबल उत्तम असल्याने व्यवसायात एखादे काम नवीन पद्धतीने कसे करता येईल हे सांगण्याचे धाडस कराल. आर्थिक आवक चांगली राहील. ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना त्यातून बऱ्यापैकी पैसा मिळेल. घरामध्ये सहलीला जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील.

शुभरंगः पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.