मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी संधीचा दिवस ! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Makar kumbh meen rashi today : कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी संधीचा दिवस ! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 14, 2024 10:32 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 14 january 2024 : मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल नववर्षाचा दुसरा रविवार ? वाचा आजचे राशीभविष्य!

Capricon, Aquarius, Pisces
Capricon, Aquarius, Pisces

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज चंद्र दिवस रात्र राहु आणि मंगळाच्या मालकीच्या नक्षत्रातुन संक्रमण करतोय. तसेच, विनायक चतुर्थी, भोगी असून, धनुर्मास समाप्ती आहे. मकर, कुंभ व मीन राशीसाठी वाचा राशीभविष्य.

मकर: 

आज राशीस्वामी शनि-चंद्र युतीत आर्थिक बाबतीत पैसा वसूल करण्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागले तरी पैसे मिळणार आहेत. कष्टाला पर्याय नसला तरी प्रगती करणार आहात. वैवाहिक तुमच्या धोरणीपणामुळे तुमचे यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. एक वेगळेच उत्साही आणि आनंदी लाभेल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. आजचा दिवस आपल्यास अत्यंत शुभ फलदायी ठरेल.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.

कुंभ: 

आज अनिष्ट स्थानातून होणारं चंद्रभ्रमण लक्षात घेता घरात आणि घराबाहेर प्रवाहाच्या विरूद्ध पोहण्याचे विचार मनात येतील आणि ते अमलातही आणाल. प्रचंड मेहनतीच्या मानाने मामुली यश मिळत असल्यामुळे थोडे निराशेकडे झुकाल. अशावेळी चुकते कुठे हे कळण्या साठी त्यातील तज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष दयावे. परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास निरर्थक ठरतील.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०६, ०८.

मीन: 

आज चंद्रबल लाभणार आहे. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. आर्थिक घडी बसेल. संतती साठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची कास धराल. स्वतःला प्रकाशात आणायचे असेल तर कोणा मध्यस्थाचा आधार घ्यावा लागेल. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. स्वतःला सिद्ध कराल.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०४, ०६.