Makar kumbh meen rashi today : समाधानाचा व आनंदाचा दिवस राहील! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!-makar kumbh meen rashi today 13 february 2024 capricon aquarius pisces zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : समाधानाचा व आनंदाचा दिवस राहील! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar kumbh meen rashi today : समाधानाचा व आनंदाचा दिवस राहील! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य!

Feb 13, 2024 11:09 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 13 february 2024 : आज १३ फेब्रुवारी २०२४ रोजी, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल मंगळवारचा दिवस ? वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Makar Kumbh Meen Rashi
Makar Kumbh Meen Rashi

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज गणेश जयंती आहे. अंगारक योग आणि साध्य योगात मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल! वाचा राशीभविष्य!

मकरः 

आज चंद्रबल लाभल्याने आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. कौटुंबिक सुखशांती आनंद दायक वातावरण राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ: 

आज चंद्रभ्रमण आणि ग्रहमान अनुकुल असल्याने आकर्षक बोलण्यामुळे लोकांच्या पोटात शिरून काम करवून घ्याल. खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल. रोजगारात मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. आंनदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

मीन: 

आज चंद्र-नेपच्युन योगात स्वतःवरचा आत्म विश्वास वाढेल. व्यवसायात कामगारांना कितीही सवलती दिल्या तरी त्यांच्या त्रासापासून सुटका मिळणार नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मनातील काहीही हातचे राखून न ठेवता मोकळ्या निर्भिड स्वभावाबद्दल तुम्ही प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करियर करणारांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.