मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : मकर व मीन राशीला रोजगारात मनासारखी बढती मिळेल! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Makar kumbh meen rashi today : मकर व मीन राशीला रोजगारात मनासारखी बढती मिळेल! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Jan 12, 2024 09:53 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 12 january 2024 : मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल नववर्षाचा दुसरा शुक्रवार ? वाचा आजचे राशीभविष्य!

Capricon, Aquarius, Pisces
Capricon, Aquarius, Pisces

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज शुक्रवार १२ जानेवारी रोजी, चंद्र मकर राशीत संक्रमण करत असून, हर्षण आणि वज्र योगात चंद्रदर्शनाचा शुभ योग आहे. मकर, कुंभ व मीन राशींचे वाचा राशीभविष्य!

मकर: 

आज चंद्रभ्रमण आणि ग्रहमान अनुकुल असल्याने आकर्षक बोलण्यामुळे लोकांकडून काम करवून घ्याल. खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल. रोजगारात मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. आंनदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ

आज चंद्र-प्लुटो योगात स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात कामगारांना कितीही सवलती दिल्या तरी त्यांच्या त्रासापासून सुटका मिळणार नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मनातील काहीही हातचे राखून न ठेवता मोकळ्या निर्भिड स्वभावाबद्दल तुम्ही प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करियर करणारांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.

मीनः 

आज प्लुटो-चंद्र युती आणि शुभ स्थानातील ग्रहयोग पाहता व्यवसायात खूप काम कराल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आनंदी उत्साही रहाल. नवीन स्थावर घेण्यासाठी प्रयत्नात रहाल. नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. कलेत हाती घेतलेल्या कामात यशस्वी रहाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहील. रोजगारात नवीन योजना राबवाल. कौटुंबिक सुख-शांती मिळेल.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.

WhatsApp channel