Makar kumbh meen rashi today : वरिष्ठ पदावर बढती! वाचा मकर, कुंभ व मीन राशींचे भविष्य-makar kumbh meen rashi today 10 january 2024 capricon aquarius pisces zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar kumbh meen rashi today : वरिष्ठ पदावर बढती! वाचा मकर, कुंभ व मीन राशींचे भविष्य

Makar kumbh meen rashi today : वरिष्ठ पदावर बढती! वाचा मकर, कुंभ व मीन राशींचे भविष्य

Jan 10, 2024 09:39 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 10 january 2024 : मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल नववर्षाचा दुसरा बुधवार ? वाचा आजचे राशीभविष्य!

Capricon, Aquarius, Pisces prediction
Capricon, Aquarius, Pisces prediction

Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज १० जानेवारी रोजी, चंद्र धनु राशीत संक्रमण करत असल्यामुळे धनु राशीत दुर्लभ योग तयार होत आहे. तसेच आज अमावस्या प्रारंभ होईल. कसा असेल मकर, कुंभ व मीन राशीसाठी बुधवार! वाचा राशीभविष्य!

मकर: 

आज बुधाशी होणारा चंद्राच्या योग पाहता कलाकारांची कला बहरेल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. उपासना करणार्‍यांना भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसाय असणार्‍यांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असे नाही. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहिल. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०७, ०८.

कुंभ: 

आज अनुकूल ग्रहयुतीत तुमच्या उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.

मीन: 

आज बुधाशी होणाऱ्या नवमपंचम योगात विचार पूर्वक निर्णय घ्या. थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलो पार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष दयावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहिल. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळण्याचे योग आहेत.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.