Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज गुरुवार ११ जानेवारी रोजी, चंद्र धनु राशीत संक्रमण करत असून, दर्श अमावस्या व मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. व्याघात योगाचा कसा प्रभाव राहील! वाचा राशीभविष्य!
आज चंद्र भ्रमणातून शुभ फलदायी घटना घडणार आहेत. तुमच्याकडे अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. या कामांना न्याय देण्यासाठी जीवाचे रान कराल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल. त्या प्रयत्नात सफलतापूर्वक यश मिळेल.
शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.
आज व्याघात योगात अविचाराची लक्ष्मणरेषा ओलांडली नाहीत तर फायद्याचे प्रमाण वाढेल. आत्म विश्वास उत्तम असल्या मुळे कोणत्याही समस्येला पाठीवर घेण्याची ताकद तुमच्याकडे राहील. तरुण वर्गात नवीन ओळखी होतील आणि त्याचे रुपांतर प्रेमात होऊ शकेल. धाडस करताना मनाशी काही आडाखे निश्चित बांधाल. घरासंबंधी समस्या होऊ शकते. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. व्यापारीवर्गाकरिता आजचा दिवस नुकसानदायक राहण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजी पूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. वाहन जपून चालवा. अपघात भय संभवते. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या.
शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०१, ०९.
आज चंद्र- शुक्र युतीत खोटी स्तुती तुम्हाला कधीच भूल पाडणार नाही. या स्वभावामुळे तुमच्या वाटेला जायचे लोक प्रकर्षाने टाळतील. नोकरीत थोडा दूरदर्शी पणा ठेऊन त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृती कडे दूर्लक्ष करून चालणार नाही. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. मित्र मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेल यात शंका वाटते. नवनविन प्रलोभने येत राहतील. आपली मानसिकेला विचलित करणाऱ्या घटना घडतीत. व्यापारात काळजी पूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. चंद्रावर शनीची दृष्टी असल्याने मोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.