Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज १ जानेवारी सोमवार रोजी, आयुष्यमान योगात कसा असेल नववर्षातील पहिलाच दिवस! जाणून घ्या मकर, कुंभ व मीन राशीचे आजचे भविष्य.
आज अनुकूल ग्रहयुतीत रोजगारात कामातील योग्य बदल आकर्षक ठरतील. अती संवेदनशील स्वभावामुळे प्रत्येक गोष्टीचा उगाचच विचार करीत रहाल. अध्यात्मिक उन्नती साधाल. तुमची वृत्ती आनंदी राहील. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल. रोजगारात सहकार्य करणारे नवे मित्र समोर येतील. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संबंधाचा फायदा उचला. व्यापारात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती संतोषजनक राहिल. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. आपल्या पराक्रमामुळे समाजात व कुटुंबात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे.
शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०१, ०८.
आज अनुकूल ग्रहयुतीमुळे नोकरदारास स्नेहपूर्वक वातावरण अनुभवता येईल. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. घरातील मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. कारण नसताना काळजी करण्याचा स्वभाव बनेल. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील. परंतु खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला असेल. व्यापारिक प्रकरणात जवाबदारी वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नवीन संप्पत्ती खरेदीचा योग आहे. आर्थिक बाबतीत मध्यम स्वरुपाचा दिवस आहे. शेअर्स मधील गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिणीत आर्थिक व्यवहार टाळावेत. विद्यार्थ्यानी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. सामाजिक कार्यामुळे आपल्या नावलौकिकेत वाढ होईल.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०४, ०८.
आज चंद्र-गुरू योगात दिवस काही बाबतीत त्रासदायक आहे. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच मार्गावर राहतील. व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. लाबच्या प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये प्रकृती व चीजवस्तूंची काळजी घ्यावी. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. ताणतणाव वाढल्याने मन व्यथित होईल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.
शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.