मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Makar Kumbh Meen Rashi Prediction : मकर, मीन राशीच्या लोकांनी आज गुंतवणुकीचा विचार करावा!

Makar Kumbh Meen Rashi Prediction : मकर, मीन राशीच्या लोकांनी आज गुंतवणुकीचा विचार करावा!

HT Marathi Desk HT Marathi
Jan 20, 2024 11:34 AM IST

Capricon, Aquarius, Pisces prediction today 20 january 2024: मकर, कुंभ, मीन राशीसाठी आजचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य…

Makar Kumbh Meen Rashi
Makar Kumbh Meen Rashi

 

मकर (Capricon zodiac)

आज ग्रहयोग उत्तम जुळून आल्यानं अनुकूल दिवस आहे. तुमच्या क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञानाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. तुम्ही मांडलेल्या नवीन कल्पनांचं स्वागत होईल. फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंना अपेक्षित संपादन करता येईल. यशाचा पुरेपूर आनंद उपभोगता येईल. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तू खरेदीचा योग आहे. जोडीदाराचा सल्ला व त्याचं वर्चस्व मान्य करावं लागेल. गाडी चालविताना वेगावर नियंत्रण ठेवावं लागेल. शुभ रंग: निळा शुभ दिशा: पश्चिम. शुभ अंकः ०५, ०८.

कुंभ (Aquarius Zodiac)

कुंभ राशीसाठी आज शुभ योग असला तरी अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. तुमच्या वाणीत आणि कृतीत तफावत दिसल्यामुळं घरचे लोक तुम्हाला जाब विचारतील. एखादा निर्णय तडकाफडकी घेण्याचा अविचार हातून घडू शकतो. तज्ञ व्यक्तींचे सल्ले घ्या, ते उपयोगी पडतील. नोकरी व व्यवसायात कामाचा व्याप आणखी वाढेल. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिकचे कष्ट करावे लागतील. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात व मीडिया क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल. कलाकारांसाठी आर्थिक लाभाचा दिवस आहे. व्यापार करणाऱ्यांना कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन आव्हानं स्वीकारावी लागतील. शुभ रंग: जांभळा शुभ दिशा: नैऋत्य. शुभ अंकः ०१, ०८.

मीन (Pisces Zodiac)

आज चंद्रबळ लाभणार आहे. प्रत्येक वेळी स्वत:च्या पद्धतीनंच काम करण्याचा आग्रह न ठेवता दुसऱ्यांचा विचार करणं आवश्यक ठरेल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल. जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. बुद्धी आणि शारीरिक शक्ती यांच्यातील समतोल ढासळल्यामुळं कामाचा वेग कमी होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमीन विक्रीतून मोठा लाभ संभवतो. घरात एखादं धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचा योग आहे. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. जुनी येणी अचानक वसूल होतील. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. स्थावर मालमत्तेतील अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. शुभ रंगः पिवळसर शुभ दिशाः ईशान्य. शुभ अंकः ०३, ०७.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

विभाग