Mahashivratri : महाशिवरात्रीला होणारा ग्रहांचा दुर्लभ संयोग या ३ राशीच्या लोकांना फळणार, पैसा आणि यश मिळणार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mahashivratri : महाशिवरात्रीला होणारा ग्रहांचा दुर्लभ संयोग या ३ राशीच्या लोकांना फळणार, पैसा आणि यश मिळणार

Mahashivratri : महाशिवरात्रीला होणारा ग्रहांचा दुर्लभ संयोग या ३ राशीच्या लोकांना फळणार, पैसा आणि यश मिळणार

Published Feb 12, 2025 04:48 PM IST

Mahashivratri 2025 Auspicious Yog In Marathi : महाशिवरात्रीला अनेक शुभ आणि दुर्मिळ योग-संयोग घडत आहे, ज्याचा काही राशींवर खूप शुभ प्रभाव पडेल. जाणून घ्या महाशिवरात्रीला कोणत्या राशींना नशीबाची खास साथ मिळणार आहे.

महाशिवरात्री 2025 दुर्लभ संयोग
महाशिवरात्री 2025 दुर्लभ संयोग

Mahashivratri 2025 In Marathi : हिंदू धर्मात महाशिवरात्री व्रताला फार महत्व आहे. महाशिवरात्री हा सण भगवान शिवाला समर्पित आहे. दरवर्षी मार्च महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी महाशिवरात्री बुधवार २६ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता असे सांगितले जाते. यंदा महाशिवरात्रीला ग्रह आणि नक्षत्रांची शुभ स्थिती तयार होणार असून, काही राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे.

यावेळी महाशिवरात्रीला अनेक महत्वाचे आणि खास दुर्मिळ योग-संयोग तयार होत आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य, चंद्र आणि शनि यांचा विशेष त्रिग्रही योग तयार होत आहे. हा योग यश आणि समृद्धीचे प्रतीक आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग आणि सिद्धयोगाचा संयोग होत आहे. या योगांमध्ये पूजा केल्याने मनोकामना लवकर पूर्ण होतात. याशिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी अमृत सिद्धी योगही तयार होत आहे. या योगामध्ये केलेल्या कार्याचे आणि व्रताचे अनेक पटींनी फळ मिळते. जाणून घ्या महाशिवरात्रीला ग्रहांच्या विशेष संयोगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना मिळतील शुभ फळ-

कर्क- 

कर्क राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील. भगवान शिवाच्या कृपेने आर्थिक बाजू मजबूत होईल. सामाजिक सन्मान व प्रतिष्ठा वाढेल. कामात यश मिळेल. तुम्ही काही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

सिंह- 

सिंह राशीच्या लोकांना नोकरीत बढतीच्या संधी मिळतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. काही लोकांसाठी जागा बदलण्याचीही शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

कुंभ- 

कुंभ राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीला ग्रहांचा शुभ संयोग शुभ राहणार आहे. जमीन, इमारती, वाहने सुखात वाढ होण्याची चिन्हे आहेत. नोकरीत प्रगतीचे मार्ग खुले होतील. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याचीही शक्यता आहे. परदेशी व्यापार वाढेल. व्यवसायासाठी सहलीला जाऊ शकता.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Priyanka Chetan Mali

TwittereMail

प्रियंका माळी ही हिंदुस्तान टाइम्स -मराठीमध्ये कन्टेन्ट रायटर असून ती राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषयांचा अभ्यास करून योग्य ती अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहचवत असते. प्रियंकाने बी कॉम आणि पत्रकारिता डिप्लोमा कोर्स केला असून ती ५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. एका स्थानिक मीडिया चॅनलमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून प्रियंकाने करिअरची सुरूवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स (डिजिटल) मध्ये भविष्य सेक्शनसाठी कन्टेन्ट रायटर म्हणून २ वर्ष काम केले आहे. प्रियंकाला फावल्या वेळेत वाचन करण्याची आणि कविता लिहिण्याची आवड आहे.

Whats_app_banner