Maha Kumbh 2025 : महाकुंभाचे ४ शाही स्नान बाकी; जाणून घ्या, कुंभमेळा कधी संपणार, पुढील कुंभमेळा कधी, कुठे?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Maha Kumbh 2025 : महाकुंभाचे ४ शाही स्नान बाकी; जाणून घ्या, कुंभमेळा कधी संपणार, पुढील कुंभमेळा कधी, कुठे?

Maha Kumbh 2025 : महाकुंभाचे ४ शाही स्नान बाकी; जाणून घ्या, कुंभमेळा कधी संपणार, पुढील कुंभमेळा कधी, कुठे?

Jan 24, 2025 11:09 AM IST

Maha Kumbh 2025: हिंदू धर्मातील मान्यतेनुसार कुंभमेळ्यात स्नान केल्याने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. जाणून घ्या महाकुंभ कधी संपणार आणि शाही स्नानाच्या तारखा-

महाकुंभाचे ४ शाही स्नान बाकी; जाणून घ्या, कुंभमेळा कधी संपणार, पुढील कुंभमेळा कधी, कुठे?
महाकुंभाचे ४ शाही स्नान बाकी; जाणून घ्या, कुंभमेळा कधी संपणार, पुढील कुंभमेळा कधी, कुठे?

Maha Kumbh 2025: दररोज लाखो भाविक महाकुंभात डुबकी लावण्यासाठी दाखल होत आहेत. हिंदू धर्मात महाकुंभाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातून सनातन धर्माच्या परंपरेचे सखोल प्रतिबिंब उमटते. दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला पूर्णकुंभ म्हणतात. बाराव्या पूर्णकुंभमेळ्यानंतर महाकुंभमेळा होतो. तब्बल १४४ वर्षांनंतर यंदा महाकुंभ होत आहे. महाकुंभमेळ्यात शाही स्नानाची व्यवस्थाही आहे. कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी काही तारखा निश्चित केल्या जातात. यंदा महाकुंभात एकूण ६ शाही स्नान होणार असून त्यापैकी २ स्नान पूर्ण झाले आहेत. जाणून घ्या, उर्वरित ४ शाही स्नानांच्या तारखा आणि महाकुंभ मेळा कधी संपेल:

महाकुंभ शाही स्नानाच्या तारखा

१. पौष पौर्णिमा: १३-०१-२०२५/सोमवार

२. मकर संक्रांत : १४-०१-२०२५/मंगळवार

३. मौनी अमावस्या (सोमवती): २९-०१-२०२५/बुधवार

४. वसंत पंचमी: ०३-०२-२०२५/सोमवार

५. माघी पौर्णिमा: १२-०२-२०२५/बुधवार

६. महाशिवरात्री: २६-०२-२०२५/बुधवार

सपन्न झाले आहेत हे शाही स्नान-

महाकुंभाला १३ जानेवारी २०२५ (पौष पौर्णिमा) पासून सुरुवात झाली. महाकुंभाचे पहिले शाही स्नान पौष पौर्णिमेच्या दिवशी तर दुसरे शाही स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी झाले. आता मौनी अमावस्या, बसंत पंचमी, माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीचे शाही स्नान शिल्लक आहे.

महाकुंभमेळा कधी संपणार?

महाकुंभमेळ्याचा समारोप महाशिवरात्रीला होणार आहे. यावर्षी २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. महाकुंभाचे शेवटचे शाही स्नानही याच दिवशी केले जाणार आहे.

प्रयागराज कंभमेळा २०२५

प्रयागराज कुंभमेळा २०२५ हा १३ जानेवारीपासून सुरू झाला. हा कुंभमेळा २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत असणार आहे. हा मेळा उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर होत आहे. या मेळ्याला महाकुंभ असेही म्हटले जाते. 

कुंभमेळ्याची ठिकाणे त्रिवेणी संगमाच्या आसपास

प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभात साधूंची शिबिरे, सांस्कृतिक परफॉर्मन्स, मेळे आणि बाजारपेठा उभारल्या गेल्या आहेत. प्रयागराज कुंभमेळ्याची ठिकाणे त्रिवेणी संगमाच्या आसपास आहेत. त्यांमध्ये त्रिवेणी संगम, आखाडे आणि तात्पुरते तंबू आणि निवाऱ्याच्या ठिकाणांचा समावेश आहे.

२०२५ नंतर कधी आणि कुठे होणार कुंभमेळा?

महाकुंभ २०२५ नंतर आता २०२८ मध्ये मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये सिंहस्थ महाकुंभ होणार आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner