Maha Kumbh 2025 Snan Dates: देशभरातील साधू-संतांची महाकुंभाची प्रतीक्षा आता संपणार आहे. १२ वर्षांतून एकदा होणारा कुंभमेळा २०२५ मध्ये प्रयागराज येथे होणार आहे. प्रयागराज महाकुंभ २०२५ पौष पौर्णिमेच्या स्नानाने सुरू होईल आणि महाशिवरात्रीच्या शेवटच्या शाही स्नानाने संपेल. महाकुंभात कल्पवास करणारे भाविक दररोज तीन वेळा स्नान करतात. पौष पौर्णिमा १३ जानेवारी २०२५ रोजी आहे, त्यामुळे या दिवसापासून महाकुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. जाणून घ्या महाकुंभाच्या शाही स्नानाच्या तारखा आणि स्नानाचे धार्मिक महत्त्व.
महाकुंभ २०२५ शाही स्नान दिनांक-
मकर संक्रांत- १४ जानेवारी २०२५
मौनी अमावस्या- २९ जानेवारी २०२५
बसंत पंचमी- ०३ फेब्रुवारी २०२५
माघ पौर्णिमा- १३ फेब्रुवारी २०२५
महाशिवरात्री- २६ फेब्रुवारी २०२५
हिंदू धर्मात महाकुंभात स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयागराजमधील महाकुंभात त्रिवेणी संगमाच्या तीरावर स्नान केल्यास पुण्यफळ मिळते. महाकुंभात स्नान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात शुभता येते. मोक्ष प्राप्त होतो आणि पापांपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार संत आणि नागा भिक्षूंसाठी शाही स्नानाला विशेष महत्त्व आहे. कुंभमेळ्याच्या परंपरेचा हा महत्त्वाचा भाग आहे.
महाकुंभाच्या पहिल्या दिवशी रवियोगाचा शुभ योगायोग तयार होत आहे. रवी योग सकाळी ०७ वाजून १५ मिनिटांपासून ते १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत असेल. असे मानले जाते की रवियोगात स्नान केल्याने अक्षय फळ मिळते.
१४४ वर्षांनंतर महाकुंभमेळ्यावर होत आहे दुर्मिळ योगायोग
प्रयागराजचा संगम हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो. प्रयागराज हे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम आहे.
कुंभमेळा हा शब्द कुंभ आणि मेळा या दोन शब्दांपासून बनलेला आहे. कुंभ हे नाव अमृताच्या अमर भांड्यावरून आले आहे. यासाठी देवता आणि राक्षसांमध्ये युद्ध झाल्याचा उल्लेख पुराणात आढळते. मेळा हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ 'एकत्रित होणे' किंवा 'भेटणे' असा होतो.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या