Rahu transit : चंद्रग्रहणानंतर लगेचच राहू करणार राशी परिवर्तन; कोणत्या राशींवर होणार परिणाम?
Rahu Rashi Parivartan 2023 : येत्या ऑक्टोबर महिन्यात राहू हा राशी परिवर्तन करणार असून त्याचा फटका प्रत्येक राशीला कमी-अधिक प्रमाणात बसणार आहे. नेमकं काय होणार? वाचा…
Rahu Transit 2023 : ग्रहण हा जसा खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी उत्सुकतेचा विषय असतो, तसाच तो ज्योतिषविद्येवर विश्वास असलेल्यांसाठीही महत्त्वाचा असतो. या दोघांसाठीही येणारा ऑक्टोबर महिना महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण अशी दोन ग्रहणं होणार आहेत. मात्र, ज्योतिष अभ्यासकांचं विशेष लक्ष लागलं आहे ते राहूच्या राशी परिवर्तनाकडं.
ट्रेंडिंग न्यूज
राहू आणि केतू हे फारसे शुभ मानले जात नाहीत. हे दोन्ही ग्रह दर १८ महिन्यांनी राशी परिवर्तन करतात. मायावी व क्रूर ग्रह अशी ख्याती असलेला राहू ऑक्टोबर महिन्याच्या मध्यानंतर चंद्रग्रहणानंतर लगेच राशी परिवर्तन करणार आहे. सध्या तो मेष राशीत असून तो मीन राशीत प्रवेश करेल.
राहूचा राशी बदल आणि चंद्रग्रहण या दोन्ही घटनांचा काही राशींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही राशींवर दोन्ही घटनांचा परिणाम होईल तर काही राशींवर एखाद्या घटनेचा परिणाम होईल. नेमका कोणत्या राशीवर काय परिणाम होईल जाणून घेऊया.
कधी आहे चंद्रग्रहण?
वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण यंदा भारतात २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ते काही वेळेपुरतं असेल. युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, हिंद महासागर आणि आर्क्टिक महासागर प्रदेशात दिसेल.
मेष: राहू मेष राशीतून मीन राशीमध्ये जाणार असल्यामुळं मेष राशीच्या लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, पण तो पुरेसा नसेल. त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहू शकतात. या लोकांना थोडं सावध राहावं लागेल.
वृषभ राशीच्या लोकांचा खर्च अचानक वाढेल आणि पैसा कुठेतरी अकडून राहील.
मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत जाच सहन करावा लागू शकतो. ह्या लोकांच्या वास्तव्याच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता आहे.
कर्क राशीच्या वृद्ध व्यक्तींना काही गोष्टींचा त्रास होऊ शकतो.
सिंह राशीच्या लोकांसाठी राहूचा राशीबदल कष्टदायक असेल. कर्जाचं ओझं वाढेल.
कन्या या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी संभवतात.
तूळ राशीच्या लोकांना तब्येतीचा त्रास जाणवेल. शत्रू निर्माण होतील.
वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. आजारपणाचा धोका आहे.
धनु राशीच्या लोकांच्या आईला त्रास होऊ शकतो.
मकर : प्रवास लांबणीवर पडेल
कुंभ : घरात वाद होऊ शकतात. जपून राहावं लागेल.
मीन : स्वभावात बदल होईल.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)
विभाग