या वर्षाचे म्हणजेच २०२४ मधील दुसरे चंद्रग्रहण १८ सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी पितृ पक्ष देखील सुरू होत आहे. यावेळी पितृ पक्षाच्या सुरुवातीला चंद्रग्रहण आणि शेवटी सूर्यग्रहण होणार आहे. चंद्रग्रहण भारतात अंशतः दिसणार असले तरी युरोपातील बहुतांश देशांमध्ये चंद्रग्रहण पूर्णपणे दिसणार आहे.
सनातन धर्मात ग्रहणकाळात शुभ कार्य करण्यास मनाई आहे आणि पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी ग्रहण होणार आहे, अशा स्थितीत या दिवशी पितरांचे श्राद्ध किंवा तर्पण करता येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, ज्योतिषांच्या मते, चंद्रग्रहण काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. त्या राशी कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
शास्त्रात असे मानले जाते की पितृ पक्षामध्ये पूर्वज पृथ्वीवर आपल्या कुटुंबाकडे परत येतात आणि सर्व पूर्वज अमावस्येपर्यंत येथेच राहतात. त्यामुळे या दिवसांमध्ये पितृ नाराज होतील असे कोणतेही काम करू नये.
या दिवशी पितरांचे श्राद्ध आणि तर्पण भक्तीभावाने करावे, असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. पितृ पक्षाच्या काळात दारात येणाऱ्या कोणत्याही प्राण्याला मारू किंवा हकलून लावू नये, तर त्यांच्यासाठी योग्य भोजनाची व्यवस्था करावी.
पितृ पक्षाच्या दिवशी पडणाऱ्या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव वृषभ राशीच्या लोकांवर जास्त असू शकतो. या राशीचे लोक भाग्याच्या बाजूने असतील. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
मिथुन राशीच्या लोकांना अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. योजना यशस्वी होतील आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि भौतिक सुखसोयी वाढतील. व्यावसायिक लोक चांगले व्यवहार करून चांगला नफा कमावण्यात यशस्वी होतील.
या चंद्रग्रहणात धनु राशीच्या लोकांची जवळपास सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला नशीब मिळेल. धार्मिक कार्यात तुम्हाला रस राहील. कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ परिणाम देईल. अचानक आर्थिक लाभाची संधी मिळेल. तुमचा आत्मविश्वास खूप उंच राहील. तुमची हिम्मत वाढेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात नफा मिळू शकतो आणि नवीन योजना आकार घेऊ शकते.
मीन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगती आणि आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. भौतिक सुखसोयी वाढतील. तुम्हाला रिअल इस्टेटचे व्यवहार करायचे असतील तर वेळ तुमच्यासाठी अनुकूल असेल.