Lunar Eclipse 2024 Visible in India : यावर्षी सप्टेंबरमध्ये पितृ पक्षाच्या प्रतिपदा तिथीलाच चंद्रग्रहण होत आहे. वर्ष २०२४ मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आज १८ सप्टेंबर रोजी मीन राशीत झाले आहे. हे चंद्रग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहणात चंद्र किंचित अस्पष्ट दिसला.
भारतीय वेळेनुसार, हे चंद्रग्रहण १८ सप्टेंबर रोजी सकाळी ६:१२ वाजता सुरू झाले आणि सकाळी १०:१७ वाजता संपले आहे. या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे ४ तास ४ मिनिटे होता.
हे चंद्रग्रहण दक्षिण अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि पश्चिम युरोप या देशांमध्ये दिसणार असले तरी भारतात ते दिसणार नाही. शिवाय, ते हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दृश्यमान होते. चंद्रग्रहण भारतात दिसत नव्हते, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध नव्हता. परंतु ज्योतिष शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. ज्या राशीत चंद्रग्रहण लागते त्या राशीच्या लोकांवर ग्रहणाचा महिनाभर प्रभाव राहतो त्यामुळे त्यांनी सांभाळून राहणे गरजेचे आहे. जाणून घ्या कोणत्या राशीवर चंद्रग्रहणाचा महिनाभर परिणाम होईल.
हे चंद्रग्रहण मीन राशीत आहे. मीन राशीतच चंद्र आणि राहूचा संयोग आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा मीन राशीच्या लोकांवर सर्वाधिक परिणाम होईल. चंद्र आपले राशीचक्र २७ दिवस आणि ६ तासात पूर्ण करतो. त्यामुळे ज्या राशीमध्ये चंद्रग्रहण होते त्या राशीवर ग्रहणाचा प्रभाव जवळपास महिनाभर टिकतो. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना या काळात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.
या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर विपरीत परिणाम होऊ शकतो. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होईल. पती-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात. मित्र आणि सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात.
हे चंद्रग्रहण नोकरी आणि व्यवसायासाठीही चांगले म्हणता येणार नाही. ही वेळ संयमाने घेणे चांगले. वाचावेसे वाटणार नाही. पण हार मानू नका आणि मेहनत कमी करू नका. तब्येतीची काळजी घ्या, अन्यथा आजार वाढू शकतात.
चंद्रग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. ग्रहणानंतर स्नान करून दान करावे. दूध, तांदूळ, साखर इत्यादी पांढऱ्या वस्तू एखाद्या गरीबाला आपल्या क्षमतेनुसार दान करा.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.