मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiacs Today 1 April 2023 : लग्नाचे प्रस्ताव येतील, परदेशी जाण्याची संधी मिळेल
आजच्या नशीबवान राशी
आजच्या नशीबवान राशी (हिंदुस्तान टाइम्स)

Lucky Zodiacs Today 1 April 2023 : लग्नाचे प्रस्ताव येतील, परदेशी जाण्याची संधी मिळेल

01 April 2023, 6:40 ISTDilip Ramchandra Vaze

Today Lucky Zodiac Signs : आजचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ काळ घेऊन आला आहे. आज काहींना विवाहाचे प्रस्ताव येतील, विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याचे योग आहेत.

मेष रास

ट्रेंडिंग न्यूज

घरात सुख आणि शांती राहील. वातावरण आनंदी असेल. आज आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला काळ आहे. मनोधैर्य उंचावलेलं असेल. विरोधकांवर सहज मात करू शकाल. व्यवहार फायदेशीर राहातील. नव्या वास्तुची खरेदी संभव आहे. नातेवाईक किंवा मित्र मंडळी मदतीला येतील. नोकरदार आज नव्या चैनीच्या वस्तू खरेदी करू शकतील. वाहन खरेदीचे योग आहेत. एकंदरीत आजचा दिवस आनंदात जाईल, शुभ दिनमान आहे.

शुभरंग: तांबूस

कर्क रास

नव्या कल्पना सुचतील. व्यापार करणाऱ्यांना आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. शासकीय योजना अमलात येतील. नोकरीत कामात सजगता असेल, त्यामुळे काम करण्यातही मजा येईल. पत्नीशी मधुर संबं राहातील. कौटुमबिक पातळीवरही आजचा दिवस चांगला असणार आहे. आज समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. मनोबल वाढेल. आत्मविशाव्साने आज काही निर्णय घ्याल. विद्याथ्यांनाही शुभ दिनमान आहे. शुभवार्ताही कानी ऐकू येतील.

शुभरंग: सफेद

सिंह रास 

कोणतीही नवी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. आपल्या इच्छा आज पूर्ण होण्याचे योग आहेत. आपल्या पाल्याची प्रगती आज समाधान देऊन जाणारी आहे. व्यापारात आर्थिकदृष्ट्या भरभराटीचे योग आहेत. व्यापारात अचानक धनलाभाचे योग आहेत. मन आनंदी राहील. काहींना प्रवास घडण्याचे योग आहेत. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नोकरीत नवी जबाबदारी अंगावर पडेल. वरीष्ठांकडून प्रशंसा होईल. दिनमान उत्तम असेल.

शुभरंग: लाल

धनु रास

अविवाहितांना आज विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आज कामं वेळेवर पूर्ण करला. घरात आनंदाचं वातावरण असेल. प्रवासाचे योग आहेत. मुलांच्या अभ्यासातल्या प्रगतीने मन आनंदी असेल. कोटुंबिक पातळीवरही आज समाधानी असाल. कलाकारांना आज अच्छे दिन आहेत. आज हातून काही चांगली कार्य घडणार आहेत. विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची संधी आहे. व्यापारात आज दिवस चांगला असेल. नोकरदारांना आज काही शुभवार्ता कानी ऐकू येईल. प्रवास लाभकारक असतील. उत्तम दिनमान.

शुभरंग: पिवळसर

विभाग