राशीनुसार आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याची माहिती मिळते. प्रत्येक राशीची आपली अशी काही वैशिष्ट्य असतात. त्या वैशिष्ट्यांनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो. आज तुमच्या राशीत काय आहे हे आधी समजलं, तर त्यानुसार दिवस कसा असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आज मंगळवार १४ मार्च २०२३. आजच्या नशीबवान राशी कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया.
सिंह: नवीन व्यापाराची योजना पुर्ण होईल. भागीदाराची योग्य साथ मिळेल. पत्नीकडून उत्तम सहकार्य लाभेल. मुलांच्या प्रगतीमुळे मन समाधानी राहील. परमेश्वराविषयी विश्वास वाढेल. कर्तृत्वात वाढ होऊन स्वतःला सिद्ध कराल. आज आकस्मिक धनलाभ होईल. विचारपूर्वक निर्णय घेतल्याने व्यापार-व्यवसायात नफ्यात वाढ होऊन अनपेक्षित लाभ होईल.
शुभरंग: लाल
कन्या: आज अनपेक्षित संधी व लाभ मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळतील. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ व विस्तार होईल. नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. बढ़ती व प्रमोशनचे योग आहेत. आजचा दिवस सफलतापूर्वक व्यतीत कराल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य लाभेल. व्यापारात नवीन योजनाची सुरुवात होऊ शकते. जुनी येणी वसुल होतील. उत्पनाचे स्तोत्र वाढतील.
शुभरंग: हिरवा
मकर : शासकीय कर्मचारी असाल तर महत्वाचे निर्णय आज घ्याल. व्यवसायात मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. मित्र नातेवाईक यांच्याकडून मदत मिळेल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्री प्रवास होईल.प्रवासातून लाभ होतील.
शुभरंग: जांभळा
कुंभ: संशोधन, साहित्यिक क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान प्राप्त होईल. आरोग्य उत्तम राहील. आज भाग्यदायक दिवस आहे. दिवस शुभ सकारात्मतेत वाढ करणारा आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. नवीन नोकरीत मुलाखतीत यश येईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करीत असल्यास बढतीचे योग आहेत.
शुभरंग: निळा