Lucky Zodiac Signs : भरभराटीचा सोमवार, आनंदी राहाल! या ५ राशींसाठी दिवस राहील लकी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : भरभराटीचा सोमवार, आनंदी राहाल! या ५ राशींसाठी दिवस राहील लकी

Lucky Zodiac Signs : भरभराटीचा सोमवार, आनंदी राहाल! या ५ राशींसाठी दिवस राहील लकी

Published Sep 09, 2024 09:35 AM IST

Lucky Rashi Bhavishya 9 September 2024 : आज भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून, या दिवशी रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, आजचा दिवस या ५ राशीच्या लोकांसाठी लकी आहे.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ९ सप्टेंबर २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ९ सप्टेंबर २०२४

आज सोमवार ९ सप्टेंबर रोजी, चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून, या दिवशी रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.

मिथुन: 

आज धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील.

कर्कः 

आज नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहील. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळण्याचे योग आहेत.

सिंहः 

आज फायदा होणार आहे. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील.

कन्या: 

आज वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. 

मकरः 

आज अनेक मार्गांनी संधी येतील. अडलेली कामे मार्गी लागतील. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेमा सृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदय कारक दिनमान आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. 

Whats_app_banner