आज शनिवार ९ मार्च रोजी चंद्र कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. जिथे शनिदेव, सूर्यदेव आणि शुक्र देव आधीच विराजमान आहेत. तसेच आज माघ मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असून, या दिवशी सिद्ध योग, षष्ठ योग, साध्ययोग आणि धनिष्ठा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आज घडणाऱ्या शुभ योग-संयोगाचा या ५ राशींना फायदा होणार आहे.
आज कलाकारांना वाव मिळेल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल.
आज भाग्याची चांगली साथ मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. कार्यक्षेत्रात भरभराट होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल.
आज उच्च शिक्षणासाठी अनेक संधी मिळतील. अडलेली कामे मार्गी लागतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे, प्रसिद्धीचे योग येतील. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील.
आज जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. व्यापारात लाभ होईल. धंद्यात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.
आज नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
संबंधित बातम्या