मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : रविवारचा दिवस 'या' ५ राशींसाठी फलदायी! पाहा आजच्या लकी राशी

Lucky Zodiac Signs : रविवारचा दिवस 'या' ५ राशींसाठी फलदायी! पाहा आजच्या लकी राशी

Jun 09, 2024 10:31 AM IST

Lucky Rashi Bhavishya 9 June 2024 : आज चंद्रभ्रमणातून नवमपंचम योग, ध्रुव योग, वृद्धी योग व वणिज करण निर्माण होणार आहे. अशात आजचा दिवस कोणत्या ५ राशींसाठी लकी ठरणार आहे जाणून घ्या.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ९ जून २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ९ जून २०२४

जोतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्रांच्या चालींवरुन भविष्याचा अंदाज बांधला जातो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलामुळे विविध शुभ-अशुभ योग आणि तिथी घडून येत असतात. यांचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव राशीचक्रातील सर्वच राशींवर पडत असतो. दरम्यान काही राशी अशा असतात ज्यांना या बदलांचा अतिशय लाभदायक परिणाम दिसून येतो. आज चंद्र मिथुन आणि कर्क राशीतून व पुनर्वसु नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या भ्रमणातून नवमपंचम योग, ध्रुव योग, वृद्धी योग व वणिज करण असणार आहे. दरम्यान या सर्व हालचालींमध्ये आज कोणत्या राशींना लाभ होणार आणि कोणत्या राशी लकी ठरणार ते जाणून घेऊया.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक असणार आहे. आज प्रत्येक कार्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मुलांच्या आवडीनिवडींकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होईल. त्यामुळे पालक आणि पाल्यातील संबंध सुधारतील. कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखाल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातसुद्धा खेळीमेळीचे वातावरण असणार आहे. कार्यक्षेत्रात मात्र आजचा दिवस सामान्य असणार आहे, फारसे विशेष काही घडणार नाही. सुट्टीचा दिवस असल्याने एखाद्या जुन्या मित्राची भेट घडून येईल. गप्पागोष्टी रंगतील. शिवाय त्यांच्या सहवासात वेळसुद्धा चांगला जाईल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायक आणि समाधानकारक असणार आहे. आज कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. नवनवीन लोक संपर्कात येतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव त्यांच्यावर पडेल. महत्वाच्या कामात आज कुटुंबातील सदस्यांची साथ लाभणार आहे. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. आर्थिक स्तिथी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. जोडीदारासोबत आज रोमँटिक वेळ घालवाल. मात्र आज कोणतेही निर्णय घेताना घाईगडबड करू नका. शांत आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आज रविवार सुट्टीचा दिवस उत्तम असणार आहे. अनपेक्षित लाभ देणाऱ्या घटना आज घडतील. सामाजिक कार्यांमध्ये हिरीरीने भाग घ्याल. हातातून समाजपयोगी काम घडतील. त्यामुळे समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. घरामध्ये अचानक नातेवाईक भेट देऊ शकतात. तुमची हरवलेली एखादी वस्तू आज परत मिळेल. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. कलात्मक आणि रचनात्मक कार्यांमध्ये मन रमेल. सोबतच तुमची अध्यात्मिक कार्यांत रुची वाढेल. अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीकारक असणार आहे. कामाच्या ठिकाणी आज तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. समाजात नावलौकिक वाढेल. महत्वाच्या कामात कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. मनामध्ये योजिलेले काम आज पूर्णत्वास जाईल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. पत्नी आणि मुलांसोबत आजचा दिवस आनंददायक असणार आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज नवमपंचम आणि वृद्धी योगात तुम्हाला विविध अनपेक्षित लाभ दिसून येतील. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात आज यश मिळेल. उद्योग-व्यवसायात विस्तार करणाऱ्या घटना घडतील. त्यामुळे आत्मविश्वास प्रचंड वाढेल. वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि सुखसमृद्धी वाढेल. महत्वाच्या कामात जोडीदाराची साथ मिळेल. बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. प्रॉपर्टीछ्या व्यवहारातून आर्थिक लाभ होईल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होऊन नावलौकिक वाढेल.

WhatsApp channel