मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : जोडीदाराची उत्तम साथ! या ५ राशीचे लोकं गणपती बाप्पाच्या कृपेने ठरतील लकी

Lucky Zodiac Signs : जोडीदाराची उत्तम साथ! या ५ राशीचे लोकं गणपती बाप्पाच्या कृपेने ठरतील लकी

Jul 09, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 9 July 2024 : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी तिथी असून, शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात आजचा दिवस या ५ राशींसाठी लकी आहे. या राशींवर विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची खास कृपा होईल.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ९ जुलै २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ९ जुलै २०२४

आज ९ जुलै २०२४ मंगळवार रोजी, चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत जाणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी तिथी असून, या दिवशी रवियोग, सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज तयार होत असलेला शुभ योग ५ राशींना लाभदायक ठरणार आहे.

मेषः 

आज सिद्धी योगात फायदा होईल. कामाची पावती तुम्हाला मिळेल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. 

वृषभ: 

आज स्वत: ज्या गोष्टींचे चिंतन कराल त्यातून भरीव काहीतरी निर्माण करून फायदे मिळवाल. आनंददायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसाया निमित्त प्रवास होईल. 

मिथुन: 

आज कामाला जास्त महत्व द्याल. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडीदाराचं चांगले सहकार्य मिळणार , त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. आरोग्याच्या तक्रारी दूर होईल. 

धनु: 

आज नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील. प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी राहाल. व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. 

मकर: 

आज शुभ फलदायी घटना घडणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. यश मिळेल.

WhatsApp channel