आज, मंगळवार, ९ जानेवारी रोजी चंद्र वृश्चिक राशीनंतर धनु राशीत जाणार आहे. धनु राशीमध्ये मंगळ आधीपासूनच आहे, अशा प्रकारे धनु राशीमध्ये चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे धन योग तयार होईल. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे आणि या दिवशी प्रदोष तिथी व्रत व मासिक शिवरात्रीचे व्रत पाळले जात आहे. ही तिथी मंगळवारी येत असल्याने ही तिथी भौम प्रदोष व्रत म्हणून ओळखली जाईल. तसेच, आज वृद्धी योग, ध्रुव योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशी भाग्यशाली ठरत आहे.
आज ग्रह-नक्षत्राच्या संयोगात तुमचे विचार स्वच्छ आणि स्पष्ट राहतील. रखडलेली कामे पार पडतील. योग्य वेळी समयसूचकता दाखवाल. हजरजबाबीपणामुळे वरिष्ठांसमोर कौतुकास पात्र व्हाल. फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करिअरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. ऊर्जादायी आणी प्रचंड उत्साहपूर्ण दिवस असेल. स्पर्धा-परिक्षेच्या मुलाखतीमध्ये यश मिळेल. नवीन व्यवसायाची सुरवात कराल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात अनेक आर्थिक मार्ग सापडतील. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. मित्रमैत्रिणीत स्नेह वाढेल. इतरावर आपला प्रभाव राहील. कलाकारांना योग्य संधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा नफा मिळेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय लाभदायक ठरणार आहेत.
आजचं ग्रह-नक्षत्राचा शुभ योग भाग्यकारक अनुभव देणारा ठरेल. तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. चित्रकार शिल्पकारांना अनेक संधी मिळतील. नोकरी बदलासाठी उत्तम योग आहे. आपल्या इच्छा पूर्ण करणारा दिवस आहे. त्याचबरोबर लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. शिक्षण क्षेत्रातील महिलांना अनुकुल प्रगतीचे शिखर गाठता येईल. गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. पैशाबाबत काटेकोर असाल. देश-विदेशात फिरण्याचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगामुळे नोकरीमध्ये चांगले आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. करिअरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. स्वतंत्रपणे कार्य करण्यात धन्यता मानाल. नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल. कौटुंबिक सहकार्याने चांगला दिवस जाणार आहे. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहील. व्यापारात आर्थिक लाभ होईल. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कर्ज प्रकरण मंजुर होतील. नवीन योजनेवर काम करण्यासाठी शुभ योग आहेत.
आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोग आपणास लाभदायी आहे. लेखक कवी, पत्रकारांना चांगले ग्रहमान आहे. नविन योजनेतून लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. कामासाठी दुरचे प्रवास घडतील. सूचक स्वप्ने पडतील. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. शिवाय स्वतःकडचा अधिकार सहजासहजी सोडणार नाही. व्यवसायिकांना योजना पद्धतीने केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या प्रगती होईल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)