मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : आर्थिक वृद्धी व सुख-समृद्धीचा दिवस! या ५ राशींना मिळेल नशिबाची भरघोस साथ

Today lucky zodiac signs : आर्थिक वृद्धी व सुख-समृद्धीचा दिवस! या ५ राशींना मिळेल नशिबाची भरघोस साथ

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 09, 2024 11:48 AM IST

Lucky Rashi Today 9 february 2024: आज ९ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी, अमावस्येच्या दिवशी ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात या ५ राशींना फायदेशीर दिवस आहे.

lucky zodiac signs today 9 february 2024
lucky zodiac signs today 9 february 2024

आज शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी चंद्र शनीच्या मकर राशीत भ्रमण करत आहे. तसेच आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून ही तिथी दर्श व मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी महोदय योग, वरियान योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने मौनी अमावस्येचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशींसाठी आर्थिक वृद्धी, सुख-समृद्धी व धन-संपत्तीचा दिवस आहे.

वृषभ: 

आज उत्तम सहकार्याचा दिवस आहे. तुम्ही इतके आशावादी आहात की तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल.  उधारी वसुल होईल. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पन्नात सुधारणा होतील. सत्ताधारी प्रशासन यांच्याकडून सहकार्य लाभेल.

कर्क: 

आज अनेक कामे मार्गी लागतील. खेळांडूसाठी चांगले ग्रहमान आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. परदेश भ्रमणाची शक्यता आहे. स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. कौटुंबिक सौख्य वाढेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत.

वृश्चिक: 

आज तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घर सजावटीच्या वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्याचा विस्तार होईल. नोकरी व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यवसाय वृद्धी होईल. पदोन्नती व प्रगती होईल.

धनु: 

आज चपळ कार्यक्षमतेमुळे कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवाल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग चांगले आहे. व्यापारी वर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल. आर्थिक मदत मिळेल. अध्यात्माविषयी श्रद्धा वाढेल. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील.

मकरः 

आज नवीन योजना यशस्वी होईल. थोडे धाडस दाखवाल. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. मनोकामना पूर्ण होतील.