Lucky Zodiac Signs : मुलाखतीमध्ये यश मिळेल, गुंतवणूक फायदेशीर ठरेल! या ५ राशींसाठी लकी दिवस-lucky zodiac signs today 9 august 2024 astrology predictions for mithun kark sinh makar kumbh rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : मुलाखतीमध्ये यश मिळेल, गुंतवणूक फायदेशीर ठरेल! या ५ राशींसाठी लकी दिवस

Lucky Zodiac Signs : मुलाखतीमध्ये यश मिळेल, गुंतवणूक फायदेशीर ठरेल! या ५ राशींसाठी लकी दिवस

Aug 09, 2024 04:30 AM IST

Lucky Rashi Bhavishya 9 August 2024 : आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पाचवी तिथी असून, नागपंचमीच्या दिवशी साध्ययोग, रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. श्रावण महिन्याचा शुक्रवार कोणत्या ५ राशींसाठी लकी राहील जाणून घ्या.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ९ ऑगस्ट २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ९ ऑगस्ट २०२४

आज ९ ऑगस्ट २०२४ शुक्रवार रोजी, चंद्र दिवसरात्र कन्या राशीत राहील. तसेच आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पाचवी तिथी असून या तिथीला श्रावण महिन्यातील नागपंचमीचा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी साध्ययोग, रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.

मिथुनः 

आज घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल. घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. व्यापारी वर्गास मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील. वारसा हक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. स्नेह निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदारा बद्दल प्रेम भावना वाढेल. 

कर्कः 

आज पूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक गोष्टींचे लाभ मिळणार आहेत. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. कायदेशीर बाबींची प्रक्रीया असेल तर निकाल आपल्या बाजुने लागेल. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नवीन वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. शारिरिक कामात वाढ करण्याचा प्रयत्न करा.

सिंहः 

आज वरिष्ठांची मने जिंकून घ्याल. व्यवहारात कोणाशी संगनमत करायचे हे ठरवून आपल्या फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करिअरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे ऐकावे लागेल. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. स्पर्धा परिक्षा मुलाखती मध्ये यश मिळेल. मागील केलेल्या कामात यश मिळेल. 

मकरः 

आज शुभ दिवस असणार आहे. सूचक स्वप्ने पडतील. मानमरातब अधिकाराचे योग संभवतात. स्वस्थ बसणार नाही. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. नविन योजनेतून लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. 

कुंभः 

आज गुंतवणूक फायदेशीर ठरेल. लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. काम सोपे कराल. घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल. आर्थिक दृष्या खुपच उत्तम दिवस आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संतती करिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल.