Lucky Zodiac Signs : धन व संपत्ती लाभेल, आर्थिक आवक वाढेल! या ५ राशींसाठी लकी दिवस-lucky zodiac signs today 8 september 2024 astrology predictions for mithun kark kanya vrishchik kumbh rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : धन व संपत्ती लाभेल, आर्थिक आवक वाढेल! या ५ राशींसाठी लकी दिवस

Lucky Zodiac Signs : धन व संपत्ती लाभेल, आर्थिक आवक वाढेल! या ५ राशींसाठी लकी दिवस

Sep 08, 2024 09:24 AM IST

Lucky Rashi Bhavishya 8 September 2024 : आज भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असून, या दिवशी बुधादित्य योगासोबत ऐंद्र योग, रवि योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, रविवारचा दिवस या ५ राशीच्या लोकांसाठी लकी आहे.

लकी राशीभविष्य, नशीबवान राशी ८ सप्टेंबर २०२४
लकी राशीभविष्य, नशीबवान राशी ८ सप्टेंबर २०२४

आज रविवार ८ सप्टेंबर रोजी, चंद्र तूळ राशीत जात असून सिंह राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. 

तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असून या दिवशी बुधादित्य योगासोबत ऐंद्र योग, रवि योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात या ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.

मिथुनः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात घरातील वातावरण सुधारेल. नोकरीत अधिकार मिळेल. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे यशस्वी होतील. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. 

कर्कः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. अनुकूल दिवस आहे. फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. परदेशी जाण्याचे योग येतील. उत्पन्नात वाढ होईल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. 

कन्याः 

आज भाग्याची साथ चांगली मिळेल. खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. यशाचा शिखर गाठाल. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठ्या अधिकाराची नोकरी मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. लाबंच्या प्रवासाचे योग येतील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिकः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. दिवस अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील. अपेक्षित यश संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. प्रगती उल्लेखनीय असेल.

कुंभः 

आज दिवस लाभदायक ठरणार आहे. देवधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. अध्यात्मिक उन्नती साधाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. 

Whats_app_banner