मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : या ५ राशींवर राहील लक्ष्मी कृपा ! वाचा कोणत्या आहेत आजच्या लकी राशीभविष्य!

Lucky Zodiac Signs : या ५ राशींवर राहील लक्ष्मी कृपा ! वाचा कोणत्या आहेत आजच्या लकी राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 08, 2024 12:20 PM IST

Lucky Rashi Bhavishya 8 May 2024 : आज ८ मे २०२४ बुधवार रोजी,या ५ राशीच्या व्यक्तिंसाठी चैत्र महिन्याचा शेवटचा दिवस फायदेशीर असणार आहे. पाहूया या लकी राशी कोणत्या आहेत.

लकी राशी, नशीबवान राशीभविष्य ८ मे २०२४
लकी राशी, नशीबवान राशीभविष्य ८ मे २०२४

आज बुधवार ८ मे २०२४ रोजी चंद्र मेष आणि वृषभ राशीतून संक्रमण करणार आहे. तसेच चंद्र भरणीनांतर कृतिका नक्षत्रातूनदेखील भ्रमण करणार आहे. या चंद्रभ्रमणामुळे दुग्धशर्करा योग जुळून येत आहे. तसेच आज चैत्र अमावस्या समाप्तीनंतर वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी प्रारंभ होत असून, या दिवशी सौभाग्य योग, शोभन योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होईल.

 मेष:

आजच्या नशीबवान राशींच्या यादीत मेष राशीचासुद्धा समावेश होतो. आज ग्रहमान अनुकुल असल्याने नवीन प्रॉपर्टीसंबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश येईल. व्यापारी लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. जवळच्या व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. रिलेशनशिप असणाऱ्यांनी जोडीसारजवळ भावना व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. कामाच्या ठिकाणी स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात स्थिरता येईल. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात मन रमेल. प्रेमप्रकरणात मनासारख्या गोष्टी घडतील. साहित्यिक क्षेत्रात चांगली प्रगती होईल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. दिवसभर मनासारख्या गोष्टी घडताना दिसून येतील. या राशीवर आज लक्ष्मीची कृपा राहिल्याने पैशांची चणचण भासणार नाही. कधीकाळी केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून आता लाभ मिळू शकतो. अचानक झालेल्या धनलाभामुळे, घरात आनंदमय वातावरण राहणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीसंबंधित निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

कन्या

कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज किंस्तुघ्न करणात परदेशवारी घडून येईल. आर्थिक नवीन गुंतवणूक कराल. स्वतःच्या मताबरोबर इतरांचाही विचार करावा लागेल. संसारिक आयुष्यात जोडीदाराच्या मना सारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. संततीच्या मताचा आदर केल्यामुळे संबंध सुधारतील. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल.घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यापारात भागीदारासोबत संभाषणातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा.

धनु

आज सौभाग्य योगात धनु राशीची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. महत्वाचे काम करण्यापूर्वी योग्य नियोजन केल्यास फायदेशीर ठरेल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील लोकांना धनलाभ होईल. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करता येईल. समोरच्या लोकांवर वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल.व्यापारात स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आज ग्रहयोग उत्तम साथ देतील. बरीच अडखळलेली कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. दुसऱ्यावर कुरघोडी करण्या अगोदर विचार करावा लागेल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील.

WhatsApp channel