आज शुक्रवार ८ मार्च रोजी चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीत जाणार आहे. तसेच आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी असून या तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग, गजकेसरी योग, सिद्धी योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आज घडणाऱ्या शुभ योग-संयोगामुळे या ५ राशी नशीबवान ठरतील.
उत्पन्नाताचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील. प्रत्येक काम पूर्ण कराल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. उद्योग व्यापार तेजी राहील. स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. प्रयत्न केल्यास थकित रक्कम प्राप्त होईल. प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल.
आज महाशिवरात्रीचा दिवस तुम्हाला लाभदायक ठरेल. बरीच देणी देऊन टाकाल. रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. पदप्राप्ती होईल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विद्यार्थी प्रगती करतील. जोडीदाराकडून आणि कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे.
आज यशप्राप्ती लाभेल. आर्थिक कामे मनासारखी घडतील. प्रगती होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. आपला छंद जोपासाल. नवनवीन कल्पना सुचतील. दिनमान उत्तम असल्याने अपेक्षेप्रमाणे लाभ होईल.
आज महाशिवरात्री असून, अत्यंत शुभ दिवस ठरेल. नवीन मालमत्तेसंबंधी विचार प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. पैशाची आवक चांगली राहील. आवडत्या व्यक्तीजवळ प्रेम व्यक्त करण्यात यश येईल. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. नावलौकिक वाढेल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल.
आज कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. स्थैर्य कामी येईल. सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. कुटुंबातुन विशेष सहकार्य लाभेल. मानसन्मान मिळेल. विद्यार्थी विद्याभ्यासात प्रगती करतील.