जोतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्र एका ठराविक वेळेनंतर आपले स्थान बदलत असतात. ग्रह-नक्षत्रांच्या राशिपरिवर्तनाने अनेक सकारात्मक-नकारात्मक योग जुळून येत असतात. या योगांचा थेट परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर होत असतो. काही राशींसाठी हे योग अत्यंत शुभ असतात तर काही राशींसाठी सामान्य असतात. आज घटित होणाऱ्या षडाष्टक योग, रंभाव्रत आणि तैतिल करणात कोणत्या राशी नशीबवान ठरणार ते जाणून घेऊया.
आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. सामाजिक कार्यात धडाडीने सहभाग घ्याल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. अचानक आनंदाची बातमी कानावर पडेल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. नातेवाइकांसोबत मनमोकळ्या गप्पा होतील. मतभेद दूर होऊन नातेसंबंध सुधारतील. कार्यक्षेत्रात आज तुमचा नावलौकिक वाढणार आहे. नवी संपत्ती खरेदी करण्याबाबत व्यवहार आज पार पडतील. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असणार आहे.
आज षडाष्टक योगात मिथुन राशीसाठी दिवस उत्तम असणार आहे. तुमच्या धाडसी आणि जिद्दीवृत्तीचे इतरांकडून कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी एक नवी ओळख मिळेल. व्यवसायाचा चांगला विस्तार होईल. त्यातून आर्थिक लाभ घडेल. जोडीदारासोबत खरेदीला जाण्याचा योग आहे. एकमेकांबाबत नव्या गोष्टी जाणून घेण्याची संधी मिळेल. त्यातून प्रेम आणि आदर वाढेल. कामानिमित्त प्रवास घडून येईल. नवीन प्रकल्प पदरात पडतील. आत्मविश्वास वाढून नव्या कल्पना डोक्यात घोळत राहतील. घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल.
आज शुभ चंद्रभ्रमणात वृश्चिक राशीच्या लोकांना दिवस चांगला जाणार आहे. आज दिवसभर ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. हातात घेतलेली कामे विनाअडथळा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज पूर्ण होतील. त्यामुळे मनावरचा ताण नाहीसा होईल. उद्योग-व्यवसायात भागीदाराची पूर्ण साथ लाभेल. मोठ्या आर्थिक डील होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्ग खुले होतील. नवीन गोष्टी शिकण्याची चांगली संधी मिळेल. कुटुंबियांसोबत फिरायला जाण्याचा योग जुळून येईल. जवळच्या लोकांसोबत दिवस उत्तम जाईल.
रंभाव्रतचा शनिवार आज धनु राशीसाठी लाभदायक असणार आहे. आज तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांचे नवे प्रयोग यशस्वी ठरतील. त्यातून आर्थिक फायदा होईल. तुमच्या बुद्धी चातुर्याचे कौतुक ऐकायला मिळेल. घरामध्ये महागड्या वस्तूंची खरेदी होईल. त्यामुळे कुटुंबातील सदस्य उत्साही असतील. कमाईचे नवे स्तोत्र निर्माण होतील. त्यामुळे फारसा खर्च झाला तरी चिंता वाटणार नाही. भागीदारीमध्ये नवा व्यवसाय सुरु करण्याचा बेत आखाल. हा व्यवसाय भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थ्यांची निवडलेल्या क्षेत्रात चांगली प्रगती होईल. पालकांना मुलांच्या बाबतीत मानसिक समाधान लाभेल.
आजचा दिवस मीन राशीसाठी फलदायी असणार आहे. अनेक दिवसांपासून रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना आज नोकरी मिळण्याचा योग आहे. जवळच्या लोकांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढेल. त्यामुळे पालकांना समाधान वाटेल. कामाच्या ठिकाणी शत्रू डोके वर काढायला बघतील. मात्र बुद्धी चातुर्याने त्यांचे कारस्थान अपयशी ठरवाल. आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. आईकडून आज आर्थिक लाभ देणाऱ्या घटना घडतील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
संबंधित बातम्या