मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : विरोधकांची मने जिंकाल, मुलाखतीत यश मिळेल! 'या' ५ राशीसाठी सोमवारचा दिवस ठरेल लकी

Lucky Zodiac Signs : विरोधकांची मने जिंकाल, मुलाखतीत यश मिळेल! 'या' ५ राशीसाठी सोमवारचा दिवस ठरेल लकी

Jul 08, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 8 July 2024 : आज आषाढ महिन्याची शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे, या दिवशी बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग, सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात आजचा दिवस या ५ राशींसाठी लकी आहे.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ८ जुलै २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ८ जुलै २०२४

आज ८ जुलै २०२४ सोमवार रोजी, चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत जाणार आहे. तसेच, आज आषाढ महिन्याची शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे, या दिवशी बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग, सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पुष्य नक्षत्र तयार होत आहे. ज्याने दिवसाचे महत्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याने त्याचा लाभ होईल. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

मेषः 

आज यशस्वी व्हाल. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी दिवस यशस्वी आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. व्यापारात लाभ होईल.

कर्क: 

आज अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होईल. प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 

सिंह: 

आज सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

कन्याः 

आज भाग्योदय कारक दिनमान आहे. अनेक मार्गांनी संधी येतील. अडलेली कामे मार्गी लागतील. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल.  आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे.

वृश्चिकः 

आज सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. अनेक जणांचे सल्लागार बनाल. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील.

WhatsApp channel