मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: वृद्धी योगात या ५ राशींना मिळेल आर्थिक बळ, जाणून घ्या भाग्यशाली राशी कोणत्या

Today lucky zodiac signs: वृद्धी योगात या ५ राशींना मिळेल आर्थिक बळ, जाणून घ्या भाग्यशाली राशी कोणत्या

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 08, 2024 01:23 PM IST

Lucky Rashi Today 8 january 2024: आज आदित्य मंगल योगात सोमवारचा दिवस या ५ राशींसाठी फायदेशीर ठरेल. जाणून घ्या या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

lucky zodiac signs today 8 january 2024
lucky zodiac signs today 8 january 2024

आज ८ जानेवारी २०२४ सोमवार रोजी, चंद्र वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे. तसेच, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून, या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, वृद्धी योग, आदित्य मंगल योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशींना आर्थिक बळ लाभेल. जाणून घ्या या ५ नशीबवान राशी कोणत्या आहेत.

वृषभ: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ स्थितीत आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. आर्थिक अडकलेली कामे पूर्ण होतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. विद्यार्थी प्रगती करतील. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिवसाचा फायदा करून घ्यावा. पत्नीकडून कडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यापारात फायदा होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा मान-सन्मान वाढेल. नोकरीत पदोन्नतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. 

कर्क: 

आज ग्रह-नक्षत्राचं पाठबळ लाभेल, हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुम्ही इतके आशावादी आहात की तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांचा उत्साह वाढेल. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. उधारी वसुल होईल. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. सत्ताधारी प्रशासनाकडून सहकार्य लाभेल.

कन्या: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगाचा लाभ होईल. बुद्धीच्या जोरावर अनेक कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कामाच्या बाबतीत दुसऱ्यांना कामाला लावाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. देश-विदेशात फिरायला जाण्याची शक्यता आहे. स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. कौटुंबिक सौख्य वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कामात यश लाभेल. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील.

कुंभ: 

आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोग करिअरमध्ये आणि कार्यक्षेत्रातील कामकाजामुळे एक वेगळाच ठसा तुम्ही उमटवाल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग असू शकतात. तुमचे एखाद्या विषयामध्ये जेवढे ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. भावाकडून नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. अध्यात्माविषयी श्रद्धा वाढेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता चांगला दिवस आहे. व्यापारी वर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील.

मीनः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात नवीन योजनांना यश लाभेल. मनःशांती मिळेल. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होईल. अपेक्षेनुसार फळ मिळेल. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाचा विस्तार होईल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. फिरायला जाण्याचे नियोजन कराल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)