मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : मासिक शिवरात्री; या ५ राशींना अपेक्षीत घटनांचा दिवस, आर्थिक लाभाचा दिवस

Today lucky zodiac signs : मासिक शिवरात्री; या ५ राशींना अपेक्षीत घटनांचा दिवस, आर्थिक लाभाचा दिवस

Feb 08, 2024 04:00 PM IST

Lucky Rashi Today 8 february 2024: आज ८ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी, मासिक शिवरात्री व्रताच्या दिवशी ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात या ५ राशींना फायदेशीर दिवस आहे.

lucky zodiac signs today 8 february 2024
lucky zodiac signs today 8 february 2024

आज गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी धनु राशीनंतर चंद्र मकर राशीत जाणार आहे. तसेच पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी असून, या दिवशी चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे धन योग तयार होत आहे. धन योगासोबतच बुधादित्य, लक्ष्मीयोग, सिद्धी योग, व्यतिपात योग आणि उत्तराषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोगही होत आहे, त्यामुळे आजचे महत्त्व वाढले आहे. मासिक शिवरात्रीचा दिवस या ५ राशींसाठी अपेक्षीत घटनांचा.

मिथुन: 

आज व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण करेल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे.

कर्कः 

आज शुभ दिवस असेल. प्रवासाचे योग आहेत. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जास्त काम करावे लागेल. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यामुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील.

कन्या: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात आर्थिक गुंतवणूक कराल. गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. मित्र परिवारामध्ये रमाल. धंद्यात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदवार्ता मिळेल. मनोबल उंचावलेले असेल. नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक स्त्रोत वाढेल.

मकर: 

आज सहकार्याची अपेक्षा कराल. आर्थिक प्रश्न सुटतील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. अपेक्षित यश संपादन करता येईल. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. विद्यार्थी वर्गासाठी नक्षत्र अनुकुल आहे. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. दिवस शुभ लाभदायी असणार आहे.

मीनः 

आज उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

WhatsApp channel