आज ८ ऑगस्ट २०२४ गुरुवार रोजी, चंद्र बुध ग्रहाच्या कन्या राशीत जाणार आहे. तसेच आज श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे आणि या तिथीला विनायकी गणेश चतुर्थी व्रत आहे. विनायकी गणेश चतुर्थीच्या दिवशी शिवयोग, सिद्ध योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने लाभ होणार आहे.
आज व्यापारात नवीन योजना आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहेत. अडलेली कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक संधी मिळतील. घेतलेले निर्णय योग्य ठरतील. रोजगारात प्रगती होईल. जबाबदारी वाढणार आहे. पराक्रम व साहसी वृत्तीत वाढ होईल. कुटुंबातील सदस्याकडून उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे फायदेशीर राहील.
आज मुलांच्या बाबतीत प्रसन्नतापूर्वक वातावरण राहणार आहे. महत्त्वपूर्ण कार्यात विशेष यश येईल. जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना अनुकूल दिवस आहे. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. मनोरंजनाकडे कल वाढेल. फिरण्याचा योग उत्तम आहे. अध्यात्माची आवड निर्माण होईल. धार्मिक कार्य करण्याची संधी मिळेल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील.
आज नवीन योजनेचा शुभारंभ होण्याचा योग आहे. वरिष्ठ खूष होतील. दूरवरचे प्रवास आनंददायक होतील. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. घरगुती उपयोगी वस्तु खरेदी कराल. सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण होतील. व्यवसायात यश मिळेल. अनेक नवीन संधी नवीन, मार्ग सापडतील. नफ्यात वाढ होईल.
आज शिव योगात नशिबाची साथ लाभणार आहे. संधी मिळेल. अत्यंत अनुकुल दिवस आहे. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. नवीन योजना फायदेशीर ठरतील. व्यापारात काही नवीन भागीदारा सोबत संबंध प्रस्थापित कराल. गृहसौख्य जोडीदारा कडून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत.
आज भाग्याची साथ चांगली मिळेल. नोकरीच्या संधी चालून येतील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. नकारात्मक विचार मात्र दूर ठेवा. रिअल इस्टेट जमीन जागा खरेदी विक्री करिता आजचा दिवस फायदेशीर ठरेल. व्यापारात आर्थिक दृष्ट्या प्रलंबित असणारी कामे पूर्णत्वास जातील. प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. पदप्राप्ती मानसन्मान मिळेल. उर्जात्मक आणि उत्साही दिवस आहे.