आज सोमवार ८ एप्रिल रोजी, चंद्र मीन राशीत जात आहे, जेथे शुक्र, राहू आणि सूर्य आधीच उपस्थित आहेत, ज्यामुळे कलात्मक योग, चतुर्ग्रही योगासह अनेक शुभ आणि फलदायी योग तयार होत आहेत. तसेच आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून ही तिथी दर्श अमावस्या किंवा सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी कलात्मक योग, त्रिग्रही योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने दिवस यशाचा राहील.
आज विद्यार्थी प्रगती करतील. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे पार पडतील. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारात फायदा होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल.
आज दुसऱ्यांचा जेवढा आदर कराल, तेवढे तुम्हाला सहकार्य चांगले मिळेल. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील.
आज काम करण्यास उत्साह येईल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. कमी श्रमात जास्त संपत्ती मिळण्याची कला गवसेल. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. गुंतवणूकीकरीता योग्य दिवस आहे.
आज अनेक कामे मार्गी लागतील. अधिकाराच्या जागेवर असणाऱ्यांना मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. प्रवासातुन लाभ होईल. परदेश भ्रमणाची शक्यता आहे.
आज जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल.
संबंधित बातम्या