आज शनिवार ७ सप्टेंबर रोजी, चंद्र शुक्रच्या तूळ राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून, ही तिथी गणेश चतुर्थी तिथी म्हणून ओळखली जाते.
गणेश चतुर्थीला ब्रह्मयोग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ योग-संयोगात ५ राशींना फायदा होणार आहे.
आज व्यवसायांना चलती जाणवेल. व्यवसायात कामाची पद्धत आखीव आणि आधुनिक असल्यामुळे कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंद दायक बातम्या मिळतील. नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल.
आज लक्ष्मीयोगात शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल.
आज अनुकूल दिवस आहे. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदारामुळे फायदा होऊ शकतो. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे. कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील.
आज देवधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. धंद्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष असतील. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल.
आज वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. जुनी येणी अचानक वसूल होईल. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. घरात एखादे धार्मिक कार्य कराल.