आज गुरुवार ७ मार्च रोजी चंद्र शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे, जिथे शुक्र ग्रह आधीच उपस्थित आहे. अशाप्रकारे मकर राशीत शुक्र आणि चंद्राच्या संयोगामुळे कलात्मक योग तयार होत आहे. तसेच माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी कलात्मक योगासह त्रिग्रही योग आणि उत्तराषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोगही तयार होत आहे. या ५ राशींना आज तयार होणाऱ्या शुभ संयोगाचा लाभ मिळेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ स्थितीत आर्थिक लाभ होतील. आनंदाचा व लाभदायक दिवस आहे. कामाचा दर्जा सुधारेल. कामाचीगती वाढेल. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य करण्याचे नियोजन होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होऊ शकतात.
आज यश मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल, त्यामुळे आनंदी वातावरण राहील. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. आर्थिक पाठबळ चांगले मिळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल.
आज नवीन वस्तु खरेदीस अनुकूल दिवस आहे. सहकार्यही मिळेल. उधारी वसूल होईल. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल.
आज शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापारात वृद्धीदायक दिवस राहील. मानधनात वाढ होईल. मान-सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल.
आज आत्मविश्वासात वाढ होऊन मन प्रसन्न राहील. देश-विदेशाचा प्रवास फायदेशीर ठरेल. प्रसिद्धीचे योग येतील. आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतुन धनलाभ संभवतो. मालमत्ते संबंधी समस्या दूर होतील. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पद-प्रतिष्ठा प्राप्त होईल. उधारी वसूल होईल.