जोतिषशास्त्रानुसार आज शुक्रवार ७ जून २०२४ रोजी चंद्र मिथुन राशीत येऊन नंतर मृगशीर्ष नक्षत्रात संक्रमण करणार आहे. या चंद्रभ्रमणातून आज नवमपंचम योग, शूल योग आणि बवकरणची निर्मिती होत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या हालचाली काही राशींवर अतिशय शुभ प्रभाव टाकणार आहेत. तसेच आज काही राशींवर शुक्र आणि शनीची शुभ कृपादृष्टी असणार आहे. आजच्या त्या ५ लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायक असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेली महत्वाची कामे आज मार्गी लागणार आहेत. उद्योग-व्यवसायात धाडसाचे निर्णय घेतल्याने आर्थिक लाभ मिळेल. अचानकपणे आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या बुद्धिचातुर्याने विरोधकसुद्धा प्रभावित होतील. त्यामुळे तुमचा नावलौकीक वाढेल. वैवाहिक आयुष्यात एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाढत जाईल. पैशांची चणचण दूर होईल. त्यामुळे मन प्रसन्न राहील.
आजच्या चंद्रभ्रमणात मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस उत्तम असणार आहे. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या नव्या कल्पनांची वाहवाह होईल. त्यामुळे तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल. कोणतेही कार्य करण्यापूर्वी उत्तम नियोजन केल्यास चांगला लाभ होईल. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने घरातील वातावरणसुद्धा आनंदी असेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमच्याबद्दल आदर वाढेल. एखाद्या गोष्टीत अडचणी आल्या तरी धैर्याने त्यातून बाहेर पडाल. व्यवसायिकांना आज चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
नवमपंचम योगात आज शुक्रवारचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ लाभदायक असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड कराल. त्यामध्ये यशस्वीसुद्धा व्हाल. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. सामाजिक क्षेत्रात निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून तुमचा नावलौकीक होईल. खेळाडूंना अचानक मोठी संधी उपलब्ध होईल. अनपेक्षित कार्यातून धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर आज मिळू शकते. एकंदरीत आजचा दिवस उत्तम असणार आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी तुमच्यापासून प्रभावित होतील. वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी पदरात पडेल. उद्योगात कमी काळात मोठी प्रगती होईल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. गप्पागोष्टी होतील. त्यांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. नातेवाईकांसोबत मनमोकळा संवाद होऊन मतभेद दूर होतील. त्यामुळे मनावरचा ताण बऱ्यापैकी कमी होईल. वडिलोपार्जित संपत्तीचा वाद संपुष्ठात येऊन आर्थिक लाभ होईल.
आजचा दिवस तूळ राशीसाठी उत्तम असणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमभावना वाढीस लागेल. महत्वाच्या कामात कुटुंबाचे विशेष सहकार्य लाभेल. आज मनाचा मोठेपणा दाखवून सहकाऱ्यांना माफ करावे लागेल. यातून तुमची प्रतिमा उंचावणार आहे. अपूर्ण राहिलेली कामे आज पूर्णत्वास जातील. आज नवमपंचम योगात नवा व्यवसाय सुरु करण्याचा निश्चय तुमच्याकडून होऊ शकतो. मात्र कोणतेही महत्वाचे काम करताना इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका.अथवा नुकसानाला तोंड द्यावे लागेल.