आज ७ जुलै २०२४ रविवार रोजी, चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत जाणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी रविपुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, हर्षन योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज तयार होत असलेला शुभ योग ५ राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
आज अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे.
आज प्रगतीकारक दिवस आहे. दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जास्त काम करावे लागेल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिवस आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.
आज आर्थिक गुंतवणूक कराल. मनोरंजन करण्याकडेही कल राहील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. पती-पत्नीस आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल उंचावलेले असेल. मित्रमैत्रिण नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. अचानक धनलाभाची संधी मिळेल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील.
आज अभ्यासात प्रगती करून घेता येईल. अडलेली कामे मार्गी लागतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. नविन संधी येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. अनुकुल घटना घडतील.
आज आपणास आर्थिक बाबतीत अनुकुलता लाभेल. उत्साही वातावरण राहील. परदेशगमनाच्या संधी येतील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल.
संबंधित बातम्या