मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: सफला एकादशीला ग्रह-नक्षत्रांचा शुभ संयोग, या ५ राशींचे भाग्य चमकेल

Today lucky zodiac signs: सफला एकादशीला ग्रह-नक्षत्रांचा शुभ संयोग, या ५ राशींचे भाग्य चमकेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 07, 2024 12:52 PM IST

Lucky Rashi Today 7 january 2024: आज नवीन वर्षाचा पहिला रविवारचा सुट्टीचा दिवस या ५ राशींसाठी फायदेशीर ठरेल. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

lucky zodiac signs today 7 january 2024
lucky zodiac signs today 7 january 2024

आज ७ जानेवारी २०२४ रविवार रोजी, तूळ राशीनंतर चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे शुक्र आणि चंद्राच्या संयोगाने लक्ष्मी योग तयार होईल. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून, या एकादशीला सफला एकादशी असे म्हणतात. सफला एकादशीला लक्ष्मी योगासोबत त्रिग्रही योग, लक्ष्मी नारायण योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने या एकादशीचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशींना नशीबाची साथ लाभेल.

वृषभः 

आज ग्रह-नक्षत्रांचा शुभ संयोगामुळे धार्मिक गोष्टींची आवड निर्माण होईल. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. देश-विदेशात फिरण्याचे योग आहेत, त्यामुळे लाभ होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहील. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धी मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील. मन प्रसन्न राहील. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील.

मिथुन: 

आजच्या ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगात कामाचे उत्तम नियोजन राहील. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पाहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. जुनी मित्रमंडळी भेटतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून, आकस्मिक धनलाभ होण्याचे योग आहे. आर्थिक प्रगतीचा दिवस ठरेल. मान-सन्मान वाढेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. कुटुंबात समाधान लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल.  मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील.

कर्कः 

आज आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मौज-मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल. तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत कला गुणासाठी चांगले वातावरण राहील. संत साहित्य आध्यात्मीक स्वरुपाचे लेखन होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मन सकारात्मक राहील . आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता उन्नतीचा दिवस आहे. आपला नावलौकिक वाढेल. जुने मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल.

तूळ: 

आज अनुकूल ग्रहयुतीत सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात आर्थिक लाभ संभव आहे. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. काहींना वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिकः 

आज शुभ ग्रहांचा संयोग पाहता व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. देश-विदेशात प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. भाग्यदायक दिवस राहील. राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होईल. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)