Today lucky zodiac signs : चंद्र-शुक्राचा राजयोग; ५ राशींना लाभदायक दिवस, पद-प्रतिष्ठा व बढतीचे योग
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : चंद्र-शुक्राचा राजयोग; ५ राशींना लाभदायक दिवस, पद-प्रतिष्ठा व बढतीचे योग

Today lucky zodiac signs : चंद्र-शुक्राचा राजयोग; ५ राशींना लाभदायक दिवस, पद-प्रतिष्ठा व बढतीचे योग

Feb 07, 2024 02:33 PM IST

Lucky Rashi Today 7 february 2024: आज ७ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी, प्रदोष व्रताच्या दिवशी ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात या ५ राशींना लाभदायक दिवस आहे.

lucky zodiac signs today 7 february 2024
lucky zodiac signs today 7 february 2024

आज बुधवार ७ फेब्रुवारी रोजी चंद्राचे गुरूच्या धनु राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी सिद्धी योग, रूचक योग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने त्याचा फायदा होणार आहे.

मिथुनः 

आज घरात मंगलकार्य घडेल. व्यवसायात नवीन भागीदार जोडाल. जादा भांडवलाची गरज वाटेल. आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. वैवाहीक जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.

सिंह: 

आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. थोराचे निर्णय लाभदायक ठरतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढेल. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित मिळेल. सहकार्य लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडेल. पदप्राप्ती व मानसन्मान वाढेल.

कन्याः 

आज अंत्यत शुभ दिवस आहे. सुख आणि समृद्धी नांदेल. उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील, प्रोत्साहन मिळेल. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन, बढती, पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. उधारी वसुल होईल. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास लाभाचा ठरेल.

मकरः 

आज सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. विरोधकावर मात कराल. धनवृद्धी होईल, आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे.

कुंभ: 

आज ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील. भावंडाची योग्य साथ मिळेल. नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येईल. आर्थिक प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल.

Whats_app_banner