Lucky Zodiac Signs : नोकरीतील बदल लाभदायक ठरतील! या ५ राशीच्या लोकांना बुधपूजन ठरेल लकी-lucky zodiac signs today 7 august 2024 astrology predictions for kark sinh tula dhanu makar rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : नोकरीतील बदल लाभदायक ठरतील! या ५ राशीच्या लोकांना बुधपूजन ठरेल लकी

Lucky Zodiac Signs : नोकरीतील बदल लाभदायक ठरतील! या ५ राशीच्या लोकांना बुधपूजन ठरेल लकी

Aug 07, 2024 07:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 7 August 2024 : आज श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून, बुधवार असल्याने बुधपूजन केले जाईल. बुपूजनाच्या दिवशी परिधी योग, शिवयोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. श्रावण महिन्याचा पहिला बुधवार कोणत्या ५ राशींसाठी लकी राहील जाणून घ्या.

नशीबवान राशी ७ ऑगस्ट २०२४, लकी राशीभविष्य
नशीबवान राशी ७ ऑगस्ट २०२४, लकी राशीभविष्य

आज ७ ऑगस्ट २०२४ बुधवार रोजी, चंद्र सिंह राशीनंतर कन्या राशीत जाणार आहे. तसेच, आज श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून, बुधवार असल्याने बुधपूजन केले जाईल. बुपूजनाच्या दिवशी परिधी योग, शिवयोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या जिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योगाचा लाभ मिळेल.

कर्कः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. तरुणांना प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन होईल किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. 

सिंहः 

आज एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. परदेशा संदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. कलाकार लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. नशीबाची साथ लाभणार आहे. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. 

तूळ: 

आज आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. पैशाची कामे होतील. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. 

धनुः 

आज स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. कलावंतांना संधी मिळतील. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसाय असणार्‍यांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. व्यवसायातून जुनी येणी वसूल होईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. 

मकर: 

आज उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. उत्तम बुद्धी मत्तेचा योग्य वापर कराल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख आणि मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.