आज शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी, चंद्र कन्या राशीनंतर तूळ राशीत जाणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे आणि या तिथीला हरतालिका व्रत आहे.
हरतालिकेच्या दिवशी शुक्ल योग, रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार हरतालिकेला शुभ योग तयार झाल्यामुळे ५ राशींना लाभ होणार आहे.
आज प्रमोशन बढतीचे योग आहेत. धार्मिक वृत्ती राहील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. लाभदायक गोष्टी घडतील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवाल. आत्मविश्वास वाढेल. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. निर्णायक यश मिळेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढणार आहे. नोकरीतील बदल फायदेशीर ठरेल. मन प्रसन्न राहील. प्रसिद्धीच्या झोतात येण्याची संधी मिळेल. कलागुणांना वाव मिळेल. आपली प्रतिभा उंचावेल. तुमचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल.
आज आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. तुमचा भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळणार आहे. स्वभाव फार उदारमतवादी राहील. आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे.
आज प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. मनाजोगे यश मिळेल. व्यापारात भांडवलाचे प्रश्न मिटतील. कर्ज प्रकरण मंजुर होतील. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग संयोगात दिवस फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. किर्ती प्रसिद्धीच्या झोतात आल्यामुळे मानसिक स्वास्थ्य मिळेल. गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. सकारात्मक परिणाम दिसतील. बंधुप्रेम मिळणार आहे. नवीन व्यक्तीशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. कलागुणांना वाव मिळेल. मनातील इच्छित काम मार्गी लागतील.