Lucky Zodiac Signs : लक्ष्मी योगात गुंतवणूक फायदेशीर ठरेल! या ५ लकी राशींना भरभराटीचा दिवस
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : लक्ष्मी योगात गुंतवणूक फायदेशीर ठरेल! या ५ लकी राशींना भरभराटीचा दिवस

Lucky Zodiac Signs : लक्ष्मी योगात गुंतवणूक फायदेशीर ठरेल! या ५ लकी राशींना भरभराटीचा दिवस

Oct 06, 2024 09:42 AM IST

Lucky Rashi Bhavishya 6 October 2024 : आज आश्विन मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून, नवरात्रीच्या चौथ्या दिवशी प्रीति योग, रवि योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, या ५ राशींना नवरात्रीच्या चौथ्या दिवशी शुभ योगाचा लाभ मिळेल.

लकी राशीभविष्य, नशीबवान राशी
लकी राशीभविष्य, नशीबवान राशी

आज रविवार ६ ऑक्टोबर रोजी, चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार आहे. तसेच आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून, या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप कुष्मांडा देवीची पूजा केली जाईल. 

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी प्रीति योग, रवि योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशात ५ राशींना नवरात्रीच्या चौथ्या दिवशी शुभ योगाचा लाभ मिळेल.

मेष: 

आज ग्रहांची साथ चांगली मिळेल. व्यवसायात अनपेक्षित यश मिळेल. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभराटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. आरोग्य उत्तम राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. प्रयत्नांना यश मिळेल.

वृषभः 

आज नशीबाची साथ लाभेल. लक्ष्मीयोगात महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. 

कन्या: 

आज कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरी व्यवसायातील वातावरण उल्हासित करणारे असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठा वाढेल. मनोबल उंचावलेले असेल.

तूळ: 

आज तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. तरुण वर्गाला आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. 

धनु: 

आज जुनी येणी वसूल होतील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. यशस्वी व्हाल. शुभयोग आहे. नोकरीत अनुकुलता जाणवेल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. 

Whats_app_banner