आज सोमवार ६ मे रोजी, मीन राशीनंतर चंद्र मेष राशीत जाणार आहे. तसेच चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी असून या तिथीला मासिक शिवरात्रीचे व्रत पाळण्यात येणार आहे. तसेच आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. आजच्या शुभ दिवशी प्रीति योग, आयुष्मान योग आणि रेवती नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या ५ राशीच्या लोकांना आज शुभाशिर्वाद मिळतील आणि दिवस लाभदायक राहील.
मिथुन राशीसाठी आज आठवड्याचा पहिला दिवस अतिशय चांगला असणार आहे.तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक सलोखा राहील. तसेच ओळखीच्या लोकांमध्ये मानसन्मान वाढेल. मित्रपरिवारासोबत कुशीत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रकृती एकदम उत्तम राहील. त्यामुळे कामात उत्साह जाणवेल. व्यवसायात नवनव्या संकल्पना अंमलात आणाल. याचा फायदा भविष्यात दिसून येईल. कमाईचे आणखी मार्ग खुले होतील. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदारासोबत आज संबंध प्रेमळ राहतील. एकमेकांच्या सानिध्यात दिवस सुंदर जाईल.
मिथुनप्रमाणेच कर्क राशीसाठीसुद्धा आठवड्याची सुरुवात चांगली होत आहे. आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. उद्योग-व्यवसायात नवे मार्ग शोधण्याची संधी मिळेल. त्यातून आर्थिक नफा होईल. तुमच्या अपूर्ण इच्छा आज पूर्णत्वास जातील. त्यामुळे मन आनंदी राहील. आरोग्य अगदी ठणठणीत असेल. दिवसभर कामात व्यग्र असाल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. बौद्धिक क्षमता वाढेल. नातेसंबंधामध्ये असणाऱ्यांसाठीसुद्धा आजचा दिवस चांगला आहे. जोडीदारावर प्रेम व्यक्ती करण्याची संधी मिळेल. मनमोकळा संवाद होऊन नात्यात स्पष्टता येईल. जोडीदारासोबत भविष्याबाबत चर्चा कराल.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. परंतु कोणावरही पटकन विश्वास ठेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकतो. नोकरदारवर्गाला कामात प्रगती होऊन वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले मतभेद बोलून दूर कराल. नातेसंबंध सुधारतील. असलेल्या गुप्त कलागुणांना वाव द्याल. मनावरचा ताण कमी होईल. कुटुंबातील तरुण व्यक्तीला सरकारी नोकरी लागण्याची शक्यता आहे.घरात आनंदी वातावरण राहील.
तूळ राशीच्या लोकांवर आज लक्ष्मीची कृपा असणार आहे. त्यामुळे जुनी येणी वसूल होतील. अचानक धनलाभ झाल्याने मन उत्साही राहील. नोकरदारवर्गाची कामात चांगली प्रगती होईल. परंतु तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनेक दिवसांपासून विचारात असलेली जमीन खरेदी करण्याची शक्यता आहे. मुलांकडून अपेक्षा पूर्ण होतील. मुलांची प्रगती पाहून मन आनंदी राहील. घरातील वातावरणही खेळीमेळीचे असणार आहे.
वृश्चिक राशीसाठी आजचा सोमवार उत्तम ठरणार आहे. ऑफिसच्या कामात मनासारखे यश मिळेल. तुमच्या कला कौशल्यांमुळे वरिष्ठ प्रभावी होतील. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभेल. याचा फायदा तुम्हाला येत्या काळात होईल. तुमचे स्वास्थ्य उत्तम राहणार आहे. कामात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. कामात एकाग्रता वाढेल, त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील. विविध मार्गाने धनलाभ होईल. विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
संबंधित बातम्या