मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : बढतीचे योग, वैवाहीक जीवनही सुखी राहील! या ५ राशी ठरतीन नशीबवान

Today lucky zodiac signs : बढतीचे योग, वैवाहीक जीवनही सुखी राहील! या ५ राशी ठरतीन नशीबवान

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 06, 2024 12:56 PM IST

Lucky Rashi Today 6 march 2024 : आज ६ मार्च २०२४ बुधवार रोजी ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात या ५ राशींची प्रगती होईल. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

नशीबवान राशी ६ मार्च २०२४
नशीबवान राशी ६ मार्च २०२४

आज ६ मार्च बुधवार रोजी, धनु राशीनंतर चंद्र मकर राशीत जाणार आहे. तसेच आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून ही तिथी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते. विजया एकादशीच्या दिवशी बुधादित्य योग, रुचक योग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. या ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.

मेष: 

आज आर्थिक स्थिती उत्तम होईल. व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवार्ता मिळेल. अपेक्षीत व्यवहार योग्य पद्धतीने होतील. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल. भाग्यकारक घटना घडतील.

मिथुनः 

आज सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्तीसंबंधी काम सुरुळित पार पडतील. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. 

कर्क: 

आज मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील. भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. भावंडाची योग्य साथ मिळेल. नविन संधी मिळणार आहे. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळेल व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल.

कन्या: 

आज प्रगतीकारक ग्रहमान आहेत. ठोस निर्णय घेऊ शकाल. आर्थिक वृद्धीची बातमी मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. बढतीचे योग आहेत. 

वृश्चिकः 

आज घरात धार्मिक कार्य घडतील.  आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या आमलातही आणाल, त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. वैवाहीक जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.

WhatsApp channel