आज शनी जयंती साजरी केली जात आहे. तसेच आजच्या दिवशी गुरुआदित्य योग, बुधादित्य योग आणि कला योगाची निर्मिती होत आहे. शिवाय चंद्र रोहिणी नक्षत्रातून भ्रमण करत असल्याने आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. या योगांचा सकारत्मक आणि नकारात्मक परिणाम परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर पडलेला दिसून येणार आहे. दरम्यान पाच राशी अशा आहेत ज्यांना या योगांचा अतिशय शुभ प्रभाव पाहायला मिळत आहे. पाहूया या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
मेष राशीच्या लोकांसाठी आज शनी जयंतीचा दिवस अतिशय चांगला असणार आहे. आज या राशीवर शनी देवाची उत्तम कृपा असणार आहे. नव्या कामांमध्ये तुमची रुची वाढणार आहे. तसेच त्यादिशेने प्रयत्नसुद्धा सुरु कराल. प्रकृतीच्या जुन्या समस्या नाहीशा होतील. त्यामुळे आरोग्य अगदी उत्तम राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी असणार आहे. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद झाल्याने गृहसौख्य लाभेल. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार असेल तर आज त्यासाठी आज आराखडा निश्चित कराल. विविध मार्गाने धनलाभ होईल. पैसा हातात आल्याने आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुम्हाला आज आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. खाजगी कार्यांमध्ये रुची घेऊन कामे पूर्णत्वास न्याल. आज तुमच्या स्वभावात सकारत्मक बदल घडून येतील. ज्येष्ठ अमावस्या असल्याने धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घ्याल. काही दिवसांपूर्वी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर त्याचा आज फायदा निश्चित मिळणार आहे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना आज चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त होईल. त्यामुळे मन अगदी प्रसन्न राहील. जवळच्या व्यक्तींसोबत निर्माण झालेले गैरसमज दूर होऊन नाते मजबूत होईल.
आज गुरुवारचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आहे. आज तुम्हाला अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. अनपेक्षित मार्गाने धनलाभ झाल्याने आनंद द्विगुणित होईल. भावंडांसोबत नातेसंबंध अधिक दृढ होतील. घरामध्ये महागड्या विलासी वस्तूंची खरेदी कराल. व्यवसायिक व्यवसायात प्रतिस्पर्धीना उल्लेखनीय टक्कर देतील. भागीदारीत नवा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर ती आज पूर्ण होईल. तुमची लव लाईफ आणखी बहरेल. जोडीदारासोबत नाते आणखी घनिष्ट होईल. कुटुंबियांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय खास असणार आहे. तुम्हाला आज आयुष्यात अनेक नव्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे प्रगतीचा वेग वाढेल. एखादी नवी संपत्ती अथवा घर खरेदीचा योग जुळून येत आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखाल. जवळच्या व्यक्तींसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आज तुम्हाला शनी देवाची विशेष कृपा लाभल्याने आयुष्यातील अडचणी दूर होतील. लव लाईफबाबत सांगायचे तर आज जोडीदारासोबत संबंध सुधारतील शिवाय त्या व्यक्तीबद्दल आणखीन प्रेम वाढीस लागेल. आयुष्याकडे बघण्याचा सकारत्मक दृष्टिकोन आज तुम्हाला मिळेल.
गुरुआदित्य योगात कुंभ राशीसाठी आजचा दिवस अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही सुरु केलेल्या नवीन कामामध्ये गती प्राप्त होईल. कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग येईल. परदेशवारी लाभदायक ठरणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना आज दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात तुमचा नावलौकीक वाढेल. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज पूर्ण होतील. त्यामुळे मनावरचा ताण नाहीसा होईल. शिवाय भागीदाराच्या व्यवसायातून धनलाभ होण्याची संभावना आहे. मात्र कोणतेही कार्य करताना घाईगडबड न करता विचारपूर्वक करा.
संबंधित बातम्या