मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: सर्वार्थ सिद्धी योगात या ५ राशींसाठी आज बंपर लाभाचा दिवस

Today lucky zodiac signs: सर्वार्थ सिद्धी योगात या ५ राशींसाठी आज बंपर लाभाचा दिवस

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 06, 2024 11:26 AM IST

Lucky Rashi Today 6 january 2024: आज नवीन वर्षाचा पहिला शनिवारचा दिवस या ५ राशींसाठी लाभदायक आहे. जाणून घ्या या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

Lucky Rashi Today 6 january 2024
Lucky Rashi Today 6 january 2024

आज ६ जानेवारी २०२४ शनिवार रोजी, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची दशमी तिथी असून, या दिवशी शश योग, सर्वार्थ सिद्धी योग, धृतिमान योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. यामुळे ५ राशींना लाभदायक दिवस जाईल, जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.

मेष: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात भाग्यदायक घटना घडतील. तीर्थयात्रेला जाण्याचे नियोजन कराल. कामाचा वेग वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. ललित कला व शिल्पशास्त्रांकरीता तसेच कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. कामानिमित्त केलेल्या दुरवरच्या प्रवासातून लाभ होतील. व्यवसायात कामगारांच्या सहकार्याने कामाचा गाडा बराच ओढून न्याल. तुमच्या नवीन कल्पनाचं स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल.

वृषभ: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना यश मिळेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण करेल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. कुटुंबातील सदस्यच तुमच्या फायद्याच्या ठरतील. व्यवसायात अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. आज नवनवीन प्रोजेक्टसाठी अनुकूल दिवस राहील. मनात उत्साह राहील.

मिथुनः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात दिवस लाभदायक असेल. नोकरी व्यवसायात नवीन क्षितीजे साद घालतील. प्रवासाचे योग आहेत. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. आपल्या शांतप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यामुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिवस आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील. आपल्या वाणीचा इतरावर प्रभाव राहील. प्रगतीकारक दिनमान आहे. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल.

कन्याः 

आज धडाडीने एखादे काम पूर्ण करू शकतात. शैक्षणिक क्षेत्रात संशोधनही चांगल्या प्रकारे करू शकता. अभ्यासात प्रगती करून घेता येईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. नविन संधी प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील.

कुंभः 

आज राहु-चंद्र योगात व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. मनापासून एखाद्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे झोकून देणे तुम्हाला जास्त आवडेल.  व्यावसायिकांची आर्थिक आवक वाढेल. नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल काळ आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)