मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : षड्तीला एकादशीला या ५ राशींना होतील उत्तम लाभ, होईल विष्णू कृपा

Today lucky zodiac signs : षड्तीला एकादशीला या ५ राशींना होतील उत्तम लाभ, होईल विष्णू कृपा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 06, 2024 01:08 PM IST

Lucky Rashi Today 6 february 2024 : आज ६ फेब्रुवारी २०२४ मंगळवार रोजी, षड्तीला एकादशीला ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात या ५ राशींना भाग्याची उत्तम साथ लाभेल, जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

lucky zodiac signs today 6 february 2024
lucky zodiac signs today 6 february 2024

आज मंगळवार ६ फेब्रुवारीला चंद्र वृश्चिक राशीनंतर धनु राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असल्याने ही तिथी शट्टीला एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी रुचक योग, हर्ष योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने षड्तीला एकादशीचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार षड्तीला एकादशीच्या दिवशी ५ राशींवर भगवान विष्णूची खास कृपा होईल.

मेष: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात अनुकुल दिवस राहील. आपल्या व्यक्तिमत्वात वाढ होईल. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. कलाकारांना वाव मिळेल. लोकांची दाद चांगली मिळेल. आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कामकाजामध्ये विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांकडुन समाधान मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक लाभदायक सिद्ध होईल. आनंदाचा दिवस राहील.

मिथुन: 

आज भावंडाची मदत मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आध्यात्मिक प्रगती होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापार वाढीसाठी चांगला दिवस राहील. मानधनात वाढ होईल. मान-सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. व्यापारात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. मनोकामना पूर्ण होईल.

कर्क: 

आज दिवस उत्तम राहील. आत्मविश्वास वाढेल व मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या दूर होतील. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. प्रवास फायदेशीर ठरेल. प्रसिद्धीचे योग येतील. आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. परमेश्वरावर विशेष आस्था निर्माण होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून धनलाभ होऊ शकतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान-सन्मान मिळेल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. उधारी वसूल होईल.

कन्या: 

आज आर्थिक लाभ घडतील. लाभदायक दिवस आहे. कामाचा दर्जा सुधारेल. जन मानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. कामाचीगती वाढू शकतो. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास घडू शकतो. प्रमोशन होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ घडेल.

वृश्चिक: 

आज कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले मतभेद दूर होतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. देश-विदेशात फिरण्याचे योग आहेत. आज आनंदी व ऊत्साही राहाल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल.  संततीकडून शुभ संदेश मिळतील. समाधानकारक दिवस राहील.