Lucky Zodiac Signs : श्रावणाचा पहिला मंगळवार वैवाहीक सुख वाढीचा! या ५ राशीचे लोकं ठरतील लकी-lucky zodiac signs today 6 august 2024 astrology predictions for vrishabh mithun sinh tula vrishchik rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : श्रावणाचा पहिला मंगळवार वैवाहीक सुख वाढीचा! या ५ राशीचे लोकं ठरतील लकी

Lucky Zodiac Signs : श्रावणाचा पहिला मंगळवार वैवाहीक सुख वाढीचा! या ५ राशीचे लोकं ठरतील लकी

Aug 06, 2024 07:09 AM IST

Lucky Rashi Bhavishya 6 August 2024 : आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी त्रिग्रही योगासह लक्ष्मी नारायण योग, वरियान योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. श्रावण महिन्याचा पहिला मंगळवार या ५ राशींसाठी मंगलमय राहील.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२४

आज ६ ऑगस्ट २०२४ मंगळवार रोजी, चंद्र सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे, जेथे शुक्र आणि बुध ग्रह आधीच उपस्थित आहेत. सिंह राशीमध्ये शुक्र, बुध आणि चंद्र यांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. याशिवाय आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी त्रिग्रही योगासह लक्ष्मी नारायण योग, वरियान योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ५ राशींना श्रावण महिन्याचा पहिला मंगळवार लाभ देणार आहे.

वृषभः 

आज प्रयत्न यशस्वी ठरतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल त्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहील. शेअर्समध्ये केलेली दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान कराल. 

मिथुन: 

आज खरेदीस अनुकूल दिवस आहे. व्यवसायात इतरांबरोबर सौजन्य दाखवल्यामुळे तसेच सहकार्यही तुम्हाला मिळेल. जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. आत्मविश्वास वाढेल आणि मन प्रसन्न राहील. 

सिंह: 

आज कलाकारांना चांगला वाव मिळेल. लोकांची दाद चांगली मिळेल. आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलां कडुन समाधान मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेमंद सिद्ध होईल. व्यापारात कामकाजामध्ये वाढ व विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. 

तूळ: 

आज आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. मनाला समाधान लाभेल. भावंडे मदत करतील. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. मानधनात वाढ होईल. संशोधन क्षेत्रातील मंडळीना मान सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. इच्छे प्रमाणे कार्य घडतील. 

वृश्चिकः 

आज जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ होईल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. कामाचा दर्जा सुधारेल. तुमची विलक्षण छाप पडेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम राहाल. कामाचीगती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे.